कै मुक्ताबाई सखाराम वाडकर यांच्या स्मरणार्थ भव्य भारुड सोहळा उत्साहात संपन्न :
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
कै. मुक्ताबाई सखाराम वाडकर यांच्या स्मरणार्थ भव्य भारुड सोहळा उत्साहात संपन्न
वरवडी : कै. मुक्ताबाई सखाराम वाडकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या सुपुत्र श्री. अनिल बापू वाडकर व वाडकर परिवाराच्या वतीने वरवडी येथे भव्यदिव्य भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारुडकार ह.भ.प. चंद्रकांत महाराज बर्गे (सातारकर) यांचे भारुड सादर झाले. त्यांच्या प्रभावी आणि रसाळ सादरीकरणामुळे उपस्थित वारकरी भाविक मंत्रमुग्ध झाले. समस्त वारकरी वाडकर परिवार तसेच वरवडी ग्रामस्थांनी या भारुडाचा मनमुराद आनंद लुटला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक असा दुहेरी साज लाभला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल बापू वाडकर, दत्ताभाऊ वाडकर, बाळू अण्णा वाडकर, दीपक दादा आंबवले, भगवान वाडकर, रमेश येवले, नामदेव आंबवले, नानासाहेब येवले, सुभाष हरिभाऊ वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.






