सोनोरी श्री काळभैरवनाथ चैत्री यात्रे निमित्त भव्य दिव्य कुस्ती आखाड्यात शेवटची कुस्ती तब्बल 75000 व गदा
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सोनोरीत श्री काळभैरवनाथ चैत्री अष्टमी यात्रा उत्साहात संपन्न
सोनोरी येथे श्री काळभैरवनाथ चैत्री अष्टमी यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीला अभिषेक व विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.
यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या श्री काळभैरवनाथ कुस्ती आखाड्यात महाराष्ट्रातील अनेक नामांकित व दिग्गज पैलवानांनी हजेरी लावली. सुमारे २५० मल्लांनी या आखाड्यात सहभाग घेतला होता. ३ हजार रुपयांपासून ते तब्बल ७५ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या रंगल्या. महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरीसह विविध मानांकित स्पर्धांमध्ये चमक दाखवलेल्या पैलवानांनीही आपली ताकद आजमावली.
माजी सरपंच बाळासाहेब नाना काळे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अंतिम कुस्तीसाठी ७५ हजार रुपयांची मानाची चांदीची गदा देण्यात आली, ज्यामुळे या कुस्तीचा उत्साह अधिकच वाढला.
समस्त सोनोरी ग्रामस्थांच्या वतीने या कुस्ती आखाड्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. यावेळी आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.






