नाझरे कडेपठार येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचीत संचालकांचा सत्कार, नवनिर्वाचित संचालकांनी कारखाना उत्तम चालवावा- विजय कोलते
संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
दिवंगत अजितदादांच्या शिस्तीमुळे सोमेश्वर कारखान्याने गाठली उंची; नवनिर्वाचित संचालकांनी कारखाना उत्तम चालवावा – विजय कोलते
नाझरे कडेपठार येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार
पुरंदर :श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला बाजारभाव देणारा कारखाना आहे. दिवंगत अजितदादा पवार यांच्या करड्या शिस्तीमुळे कारखान्याने मोठी उंची गाठली आहे. त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांनी अजितदादांचे स्मरण ठेवून कारखान्याचा कारभार उत्तम प्रकारे चालवावा, असे आवाहन राज्य कृषी परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते यांनी केले.
नुकत्याच पार पडलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या छबुताई अंकुश नाझीरकर यांचा सत्कार नाझरे कडेपठार येथे विजय कोलते यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पुरंदर तालुक्यातून निवडून आलेले कारखान्याचे संचालक उत्तम धुमाळ (जेऊर), सतीश जगताप (मांडकी), सुधाकर टेकवडे आणि डॉ. वसंतराव दगडे (निरा) यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला नाझरे कडेपठारच्या सरपंच अश्विनी नाझीरकर, माणिकआबा चिकणे, दीपक चिकणे, शिवाजीराव नाझीरकर, शहाजी कापरे, ईश्वर कापरे आणि सचिन कापरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊ कापरे यांनी केले, तर शिवाजी कापरे यांनी उपस्थितांचे आभार मानले
#सोमेश्वरसहकारीसाखरकारखाना #सोमेश्वरकारखाना #पुरंदर #विजयकोलते #अजितदादापवार #संचालकमंडळ #छबुताईनाझीरकर #ऊसउत्पादकशेतकरी #सहकारक्षेत्र #नाझरेकडेपठार #सह्याद्री न्यूजनेटवर्क






