हुतात्मा उमाजीराजे नाईक यांची 233 वी जयंती भिवडी येथे शासकीय इतमामात संपन्न
भिवडी येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची शासकीय जयंती
प्रतिनिधी सह्याद्री माझा सासवड (भिवडी) ता.पुरंदर येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे स्मारक असून या स्मारकात उमाजी नाईक यांची २३३ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी स्मारकाला आकर्षक सजावट करत,
राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे पूजन, मानवंदना, पुष्पवृष्टी, राष्टगित असे कार्यक्रम झाले.
यावेळी आमदार संजय जगताप प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप, सरपंच श्वेता चव्हाण,
जेजुरी देवस्थानचे विश्वस्त पोपट खोमणे, मंगेश घोणे, आप्पासाहेब चव्हाण, रवी खोमणे, अशोक खोमणे, माऊली खोमणे, मोहण मदणे, प्रशांत वांढेकर, राहुल गायकवाड, सुनील धिवार, अमोल शिंदे, दीपक जावळे, विलास चव्हाण, आप्पा भांडवलकर, विकास भांडवलकर, गणेश मोरे, मावली खोमणे, उपस्थित होते.
प्रशासणाच्या वतीने तहसीलदार विक्रम रजपूत, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, गटविकास अधिकारी डॉ अमिता चव्हाण, तलाठी स्नेहा कांबळे यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.






