महाराष्ट्र

जवळार्जुन येथे स्वाध्याय परिवाराकडून योगेश्वर कृषी पूजन उत्साहात संपन्न


उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे ::
जवळार्जुन येथे स्वाध्याय परिवाराकडून योगेश्वर कृषी पूजन उत्साहात संपन्न

जवळार्जुन (प्रतिनिधी) – स्वाध्याय परिवार यांच्या वतीने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर गावामध्ये योगेश्वर कृषी पूजन भक्तिभावाने संपन्न झाले. परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला स्वाध्याय परिवार आज संपूर्ण देशभर कार्यरत असून जवळार्जुन गावातही गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ सातत्याने स्वाध्याय कार्य सुरू आहे.

गावामध्ये योगेश्वर कृषीची स्थापना झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय तृतीया या पवित्र दिवशी ग्रामस्थ भाऊ व ताईंनी मोठ्या भक्तिभावाने एकत्र येत पूजन केले. दांपत्य स्वरूपात सहभागी होत सर्वांनी मनोभावे योगेश्वर कृषीचे पूजन करून आध्यात्मिक वातावरण निर्माण केले.

या पूजन सोहळ्यात जिल्हा व तालुका स्तरावरील स्वाध्याय परिवारातील भाऊ व ताईंनीही उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पूजनानंतर सर्वांनी एकत्र येत प्रसादाचा लाभ घेतला. गावामध्ये भक्ती, एकता आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.


Translate »
error: Content is protected !!