ताज्या घडामोडीपुणे

ॲड. प्रकाश खाडे हे सासवडचे सत्शील व्यक्तिमत्व : ॲड.के .आर .शहा , अण्णा खाडे यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम संपन्न


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

ॲड. प्रकाश खाडे हे सासवडचे सत्शील व्यक्तिमत्व : ॲड.के .आर .शहा

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक
सासवडचे जेष्ठ विधीज्ञ यांनी ५० वर्षे वकील की, केली ते ॲड. प्रकाश खाडे हे सत्वशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचे सारखे प्रामाणिक व समाजाबद्दल आपुलकी असणारे वकील जन्माला यावेत हा ईश्वरी संकेत आहे. कर्तव्य निष्ठेने काम करीत राहिल्यानेच ते ७५ वर्षे यशस्वी जगले. असे भावपूर्ण उद्गार प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.के.आर.शहा यांनी काढले.

सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.प्रकाश खाडे यांचा अमृतमहोत्सवी समारंभ आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानने आचार्य सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ॲड. प्रकाश खाडे यांचा सत्कार त्यांचे गुरु ॲड. के .आर. शहा यांच्या हस्ते करण्यात आला. समारंभाचे अध्यक्षस्थानी ॲड. सुधाकर आव्हाड होते.

सत्काराला उत्तर देताना ॲड.खाडे म्हणाले की, संत सोपान काकांच्या पावनभूमीत माझा जन्म झाला, हे मी माझे भाग्य समजतो. माझे वडील कै. म्हाळसाकांत खाडे(वकील) स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा घेऊन, मी वाटचाल करीत आहे.सासवड व पुरंदरकरांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. त्यांच्या पत्नी सौ. मंगल खाडे यांचा सत्कार साडी-चोळी देऊन, प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ.शशिकाला कोलते यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी ॲड.राजेंद्र उमाप, माजी आमदार अशोक टेकवडे, संजय जगताप, म.सा.प.सासवडचे अध्यक्ष ॲड.दिलीप निरगुडे,ॲड.तेजस प्रकाश खाडे,डॉ. सुभाष तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी डॉ.विनायक खाडे व खाडे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मणराव चव्हाण, ॲड.प्रकाश बोत्रे , ॲड.बाजीराव झेंडे,ॲड.अविनाश भारंबे,बाळासाहेब कामथे, वसंतराव ताकवले, सुनील लोणकर, गौरव कोलते, सचिन पेशवे,

प्रसाद अत्रे , ॲड.चंदन मेमाणे उपस्थित होते . डॉ.विनायक खाडे यांनी स्वागत केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शांताराम पोमण यांनी मानपत्राचे वाचन केले. ॲड. कलाताई फडतरे यांनी आभार मानले व सचिन धनवट यांनी सूत्रसंचालन केले.


Translate »
error: Content is protected !!