न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन येथे शिक्षक दिन उत्साहात संपन्न
उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे::
न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
जवळार्जुन : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संकेत महाराज जगताप यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे महत्त्व सांगत “गुरुविण अनुभव कैसा कळे” या विषयावर मार्गदर्शन केले. आई-वडील व गुरु हेच संस्कार देणारे असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सचिन टेकवडे, गणेश पवार, पत्रकार नवनाथ राणे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या शिक्षिका दिवाणे मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा दहावीतील विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन गौरव केला.
विद्यार्थी व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजन सहशिक्षक गायकवाड सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी दिया राणे व प्रणिती राणे यांनी केले. मुख्याध्यापक निगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.






