ताज्या घडामोडीपुणेशैक्षणिक

जीवनाच्या यशस्वीतेसाठी बाप हिरो तर आईच हीरोइन असली पाहिजे : चांडाळ चौकडी फेम अभिनेते रामभाऊ जगताप


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा (हनुमंत वाबळे):

जीवनाच्या यशस्वीतेसाठी बाप हिरो तर आईच हिरोईन असली पाहिजे – रामभाऊ जगताप

*वाघीरे महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात साजरे*

    महाराष्ट्रा भूमी ही संतांची, वीरांची आणि कलेची तसेच सुसंस्कृत राजकारणाची आहे. तर महाविद्यालय ही ज्ञान मंदीर आहे याची जाणीव सर्वांनी ठेवा. बालपण, शिक्षण, करियर आणि प्रेम ह्या चार सूत्रे यशस्वी जीवनाची असून प्रत्येकाने स्वक्षेत्र निवडून झोकून

द्यावे लागेल. जे काय करायचं ते आपल्यालाच करायचंय, जगाच्या बाजारात टिकण्यासाठी व यशस्वीतेसाठी जीवनात आपला बाप हिरो तर आईच हिरोईन असली पाहिजे असे आव्हान चांडाळ चौखडी फेम वेबसीरीजचे श्री.रामभाऊ जगताप यांनी विद्यार्थ्यांना केले. पुणे जिल्हा

शिक्षण मंडळाच्या सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण आणि वार्षिक स्नेहसंमेलन महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

या समारंभास प्रमुख पाहुणे चांडाळ चौखडी फेम वेबसीरीजचे श्री.रामभाऊ जगताप, श्री.सुभाषराव मदने, श्री.निखिल साळुंखे(चेअरमन)आणि  कु. रेशमा पुणेकर (कर्णधार भारतीय बेसबॉल संघ शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त) हे

होते. प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे (पुणे विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य),  मा. एल. एम. पवार (उपसचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्य डॉ.पंडित शेळके यांनी केले.आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी महाविद्यालयाची माहिती देऊन शैक्षणिक वर्षामध्ये महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या सर्व कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना गुणवत्ता वाढीसाठी कसा उपयोग झाला हे सांगितले.

प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व परिचय प्रा. ऋषिकेश कुंभार यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले.

यानंतर वर्षभरात  शैक्षणिक, सांस्कृतिक, विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा विविध शिष्यवृत्ती, एनसीसी आणि एनएसएस इत्यादी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सन २०२४ – २०२५ या शैक्षणिक वर्षात विविध क्षेत्रात विशेष

प्राविण्य प्राप्त केलेल्या प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील प्रशासकीय सेवक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ, सुभाष वाव्हळ,  डॉ.संजय झगडे, डॉ.बबन माने, डॉ. विलास वाणी, प्रा.सचिन शहा, डॉ.नानासाहेब पवार,

डॉ . तुषार घोरपडे, प्रा.राजेश देशमुख, प्रा.रुकसाना शेख, प्रा. ऋषिकेश कुंभार  (शारीरिक शिक्षण संचालक), प्रा.दिलीप मेटकरी, सिद्धी तानवडे (विद्यार्थी प्रतिनिधी) हर्षदा उबाळे (यिन सचिव  ) समीर भिसे (यिन अध्यक्ष )  श्री.अशोक कोंढावळे, श्री.रवी जाधव, सौ. मीरा चिकणे, श्री अंकुश धायगुडे, श्री संतोष लोणकर, गणेश खोडके, संदीप दगडे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या रेश्मा पुणेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की ” वेळेचा सदुपयोग करून भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कला ही मानवी जीवनाला दिशा देत असते, कलेने माणूस समृद्ध होतो.तसेच मानवी जीवनात सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी शारिरीक शिक्षणाबरोबरच मैदानी ‘खेळ खेळले पाहिजेत.  आपल्या जीवनातील सांगत अभ्यासात सातत्य आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा तितकाच गुरुजन आणि आई-वडिलांचा आदर ही महत्त्वाचा आहे. याकडे मुलांचे लक्ष वेधले.यावेळी चांडाळ चौखडी फेम वेबसीरीजचे श्री.सुभाषराव मदने यांचेही मार्गदर्शन झाले.

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. एल. एम. पवार (उपसचिव, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ) म्हणाले “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण मोलाची भूमिका बजावतात कला, क्रीडा, शिक्षण, समाजसेवा अशा विविध क्षेत्रात वर्षभर काम केलेल्या आणि नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित गुणगौरव हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या माध्यमातून केला जातो याकडे लक्ष वेधले तसेच महाविद्यालयाने वर्षभरात आयोजित केलेल्या स्तुत्य कार्यक्रमांचे कौतुक केले”

यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील विविध विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य, समूहनृत्य सादर केली, यावेळी महाविद्यालय प्रांगणात वाघीरे बाजारचे आयोजन केले होते तसेच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांमध्ये (कला,वाणिज्य आणि विज्ञान विभागात) प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये  सिद्धी झगडे, संपदा इंदलकर, काजल शिंदे, निकिता यादव, समृद्धी कदम ,अंकिता वेलगावकर, दामिनी राजवडे, देवदत्त भाटे, सिद्धार्थ धुमाळ,तर संस्कृतिक विभागांतर्गत हर्षदा उबाळे, नेहा न्हालवे,अथर्व भंडारी अविष्कार साबळे श्रेयस पवार, तसेच पथनाट्य टीम (फर्स्ट प्राइस पुणे युनिव्हर्सिटी गोल्ड मेडल) राष्ट्रीय छत्र सेना विभाग अंतर्गत प्रथम इंदलकर, निशांत धुमाळ, श्रावणी जगताप, श्रेया शिर्के, सुजल पवार , शिवम जाधव, क्रीडा विभागांतर्गत महेश वेदपाठक ( बॉल बॅडमिंटन ऑल इंडिया) शितल तांबे(क्रॉस कंट्री ऑल इंडिया) प्रियंका पायगुडे, हनुमान अत्तर, प्रदीप वेदपाठक मुलानी अफान, इत्यादीं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी प्राध्यापक, शिक्षकेतर, सेवक यांचा कामातील उत्साह वृद्धिंगत व्हावा, चैतन्य निर्माण व्हावे यासाठी त्यांना गुणवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात केला. यामध्ये गुणवंत शिक्षक डॉ. शुभांगी शिंदे (पेटंट), प्रा.अपूर्वा चिल्लाळ (सेट पास), प्रा.प्रतीक्षा पोमन, (नेट पास) वर्षाराणी जगताप (नेट पास),गुणवंत शिक्षक डॉ. किरण गाढवे, प्रा.संदीप शिंदे, प्रा.अश्विनी पवार, प्रा.निलम भोसले प्रा.अमर होळकर ज्योती चव्हाण, गुणवंत कार्यालयीन सेवक श्री.भरत खोमणे, श्री.राहुल जाधव, श्री. सतिश कदम, नंदकुमार वारे, यांचा समावेश होता.
या कार्यक्रमासाठी पारितोषिक विजेत्यांसह ११४९ विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर सहभागी झाले होते .
पारितोषिक वाचन उपप्राचार्य डॉ.सुभाष वाव्हळ, डॉ. ऋषिकेश कुंभार, प्रा. गजेंद्र अहिवळे, प्रा. बापू खाडे, डॉ. भाग्यश्री मदभावीकर, डॉ. विद्या पाटणकर यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा.किरण गाढवे, प्रा.अपूर्वा चिल्लाळ,  प्रा. समीर कुंभारकर. अणि प्रा.शीतल कल्हापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. विलास वाणी यांनी केले.


Translate »
error: Content is protected !!