शैक्षणिक दाखले मिळावेत यासाठी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
प्रतिनिधी सह्याद्री माझा::–
पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांना तहसीलदार कार्यालयातून शैक्षणिक कामासाठी दिले जाणारे, दाखले वेळेत मिळावेत, यासाठी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देण्यात आले. शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षा
निकाल जाहीर झाल्याने, पुढील अभियांत्रिकी, वैद्यकीय सह ,इतर उच्च शिक्षणाकरता उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल नॉनक्रिमिलेअर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, शेतकरी प्रमाणपत्र, अल्पभूधारक इत्यादी दाखले मिळण्याकरिता सेतू केंद्रासह, ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्रात विहित नमुना व संबंधित कागदपत्रे पुरावे जोडून,
अर्ज दिलेले आहेत. परंतु मागील काही दिवसापासून, सदर ऑनलाईन सेवा विस्कळीत असल्याने, विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होत आहे. विशेषत परिंचे येथील नागरी सुविधा केंद्र वरील 10 ते 15 दिवसापूर्वी सादर केलेले 70 ते 80 अर्ज अद्याप पर्यंत प्रलंबित आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध न झाल्याने, पुढील प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहे. तरी शैक्षणिक कारणास्तव दिले जाणारे दाखले, प्राधान्याने वितरित
करण्यासंबंधी आपण आदेश द्यावेत, अशी मागणी पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरंदर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन (भैय्या )महाजन,
मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजी काळाणे, सासवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुषार जगताप ,माजी नगरसेवक नंदू (बापू) जगताप, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मोबीन बागवान आदी उपस्थित होते.






