शैक्षणिक

दुर्गम कुंड – राजीवडीतील विद्यार्थिनींची पायपीट थांबणार, मित्र मेळा फाउंडेशन कडून मुलींना सात सायकलींचे मोफत वाटप!


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::

दुर्गम कुंड-राजीवडीतील विद्यार्थिनींची पायपीट थांबणार; मित्रमेळा फौंडेशनकडून सात सायकलींचे मोफत वाटप

भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील दुर्गम कुंड-राजीवडी येथील शालेय विद्यार्थिनींच्या शिक्षणाची वाट आता अधिक सुकर होणार आहे… शाळेत जाण्यासाठी दररोज पाच ते सात किलोमीटरची पायपीट करणाऱ्या सात विद्यार्थिनींना मित्रमेळा फौंडेशनच्या वतीने मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले… राजीवडी गावात पहिल्यांदाच सायकली आल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये मोठे कुतूहल आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले…

राजीवडी येथे आयोजित या कार्यक्रमाला मित्रमेळा फौंडेशनचे राहुल पार्लेकर, युवा उद्योजक रवींद्र वरे, पसुरे गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ यांच्यासह विविध मान्यवर, ग्रामस्थ, महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

दरम्यान, मित्रमेळा फौंडेशनच्या वतीने बारे येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही वह्या, कंपास आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले…

दुर्गम आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मित्रमेळा फौंडेशनकडून सुरू असलेली ही सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणारी ठरेल, अशी प्रतिक्रिया तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी यावेळी व्यक्त केली…


Translate »
error: Content is protected !!