ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

सासवड कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनींकडून माजी मुख्याध्यापिका यांच्या हस्ते शाळेत कलर प्रिंटर भेट


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
कन्या प्रशाला सासवड माजी उपस्थित विद्यार्थ्यानींकडुन माजी मुख्याध्यापिका, शिक्षकांच्या हस्ते आजी मुख्याध्यापिका व शिक्षकांकडे कलर प्रिंटर शाळेस भेट

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित कन्या प्रशाला सासवड माजी विद्यार्थिनी व शिक्षक मेळावा शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला, तीस ते पस्तीस वर्षांनी मुलींनी एकत्र येत सासवड येथे चांगला आदर्श निर्माण केला,

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे व सरस्वती देवतेचे पूजन करण्यात आले, मुख्याध्यापिका सौ. काळभोर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली 1989 ते 1996 पासुन कन्या शाळेच्या कार्यरत

असलेल्या मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम, पवार सर, पाटील सर, पाटील मॅडम, जगदाळे सर,देशमाने सर, त्या वेळचे जगताप शिपाई ,मुलानी शिपाई आणि जवळपास त्या काळच्या सव्वाशे विद्यार्थिनी

उपस्थित होत्या, या स्नेह मेळाव्यात शाळेच्या सर्व उपस्थित माजी विद्यार्थिनींच्यांतर्फे , माजी मुख्याध्यापिका माजी शिक्षक वृंद यांच्याहस्ते अद्यावत असा कलर प्रिंटर भेट देण्यात आला, तसेच माजी

विद्यार्थिनींकडुन ,माजी आणि आजी मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या स्नेह मेळाव्यासाठी जवळपास 125 मुली उपस्थित होत्या,

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका सोनवणे संगीता झुरंगे ,प्रज्ञा लांडगे ,शोभा जमदाडे यांनी गेली एक महिनाभर मुलींच्या बरोबर सतत संपर्क करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं,

या स्नेह मेळाव्याचे सूत्रसंचालन शिल्पा बोरावके, प्रास्ताविक संगीता झुरंगे, व आभार सुनिता लडकत यांनी मानले,
त्यानंतर माजी शिक्षक, व विद्यार्थिनींनी जेवणाचा आस्वाद घेतला.


Translate »
error: Content is protected !!