दसूर विकास सोसायटीचा सभासदांना लाभाचा गोडवा! १० टक्के लाभांश वाटपाने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण.
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे : दसूर विकास सोसायटीच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांशाचे उत्साहात वाटप!
**दसूर :** दसूर विकास सोसायटीच्या वतीने संस्थेच्या सभासदांना १० टक्के डिव्हिडंड (लाभांश) वाटपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी जयसिंह (बाळदादा) मोहिते पाटील तसेच विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे चेअरमन **धनंजय वासुदेव सावंत पाटील** यांच्या हस्ते सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व लोकनेते वसुदेव आप्पा यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सभासदांना १० टक्के लाभांशाचे धनादेश व रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी सोसायटीचे संचालक मंडळ, सचिव तसेच गावातील प्रतिष्ठित सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या पारदर्शक, विश्वासार्ह आणि प्रगतीशील कारभारामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सभासदांनी चेअरमन धनंजय वासुदेव सावंत पाटील व संपूर्ण संचालक मंडळाचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
**सभासदांचा विश्वास आणि पारदर्शक कारभार हीच संस्थेच्या यशस्वी वाटचालीची खरी ताकद असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.**
दसूर विकास सोसायटीचा सभासदांना लाभाचा गोडवा! १० टक्के लाभांश वाटपाने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण.






