सासवडमध्ये वाढत्या चोऱ्यांमुळे पोलीसगस्त वाढवण्याची नगरसेविका प्रियंका साकेत जगताप यांची मागणी पोलीस स्टेशनला निवेदन
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
सासवडमध्ये वाढत्या चोऱ्यांमुळे पोलीस गस्त वाढवण्याची नगरसेविका प्रियांका साकेत जगताप यांची मागणी
सासवड: सासवड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बंद घरे, दुकाने आणि पार्क केलेल्या वाहनांच्या चोऱ्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष साकेत जगताप आणि अमोल जगताप यांनी सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना नगरसेविका प्रियांका साकेत जगताप यांचे मागणीपत्र सुपूर्द केले. या निवेदनाद्वारे शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, संशयित ठिकाणी अचानक नाकाबंदी करावी, बीट मार्शलच्या फेऱ्या नियमित कराव्या आणि परप्रांतीय कामगारांची चौकशी करून गुन्हेगारीवर तातडीने आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.






