क्राईम न्यूज

दिवे गावात कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला ; जुन्या भांडणातून वीस वर्षीय अक्षय शिंदे गंभीर जखमी


# दिवे गावात कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला; जुन्या भांडणातून २४ वर्षीय अक्षय शिंदे गंभीर जखमी

**सासवड | सह्याद्री न्यूज नेटवर्क**

पुरंदर तालुक्यातील दिवे गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अक्षय अजय शिंदे असे जखमी तरुणाचे नाव आहे.

दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दिवे येथील काळेवाडी पुलाजवळ ही घटना घडली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अक्षय याला बोलावून घेतले. यावेळी सनी व पलेश यांनी अक्षयचे हात धरून ठेवले, तर प्रतीक याने कोयत्याने त्याच्या डोक्यावर व दोन्ही हातांवर वार केले. त्यानंतर अक्षय खाली पडल्यानंतर तिघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच डोक्यात दगड मारून घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी अक्षयचे वडील अजय भिमराव शिंदे (वय ४६, व्यवसाय वॉचमन, टाटा मोटर्स सासवड) यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

त्यानुसार प्रतीक शैलेश सोनवणे, सनी शैलेश सोनवणे आणि पलेश मनोज सोनवणे (सर्व रा. दिवे, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ५४६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५१(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.४१ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सय्यद पुढील तपास करीत असून आरोपींचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

**सह्याद्री न्यूज नेटवर्क – पुरंदर तालुक्यातील ताज्या घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा.**

#सासवडपोलीस #दिवेगाव #पुरंदर #कोयत्यानेहल्ला #क्राईमन्यूज #अक्षयशिंदे #पुणेजिल्हा #सह्याद्रीNewsNetwork #SaswadPolice #CrimeNews


Translate »
error: Content is protected !!