पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याकडून वह्यांचे वाटप
स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवतारेंकडून विद्यार्थ्यांना वहीवाटप
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर हवेली मतदारसंघातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा निर्णय माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि
शिवसेनेच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर महाविद्यालय येथे शिवतारे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची आज सुरवात करण्यात
आली. यावेळी महिला आघाडीच्या ममता शिवतारे – लांडे, नगरसेविका अस्मिता रणपिसे, विद्या टिळेकर, माजी नगरसेवक राजेश दळवी, युवासेनेचे उपजिल्हा
प्रमुख मंदार गिरमे, शहरप्रमुख मिलिंद इनामके, सुरज जगताप, श्रीकांत टिळेकर, अजित चौखंडे, शिरीष पाटील, रोहित ताम्हाणे यांच्यासह अनेक शिवसैनिक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शिवतारे म्हणाले, मतदारसंघात तीन लाख वह्या वाटपाचा हा उपक्रम आहे. पुरंदर हायस्कूल, वाघिरे महाविद्यालय, मएसो विद्यालय आणि कन्या शाळा
सासवड येथे आज भेट दिली आणि वह्या वाटप देखील केले. या निमित्ताने विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधता आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नेहमीच एक उत्साह वाटतो कारण त्यांच्यातील सळसळतं चैतन्य
पाहिल्यानंतर बालपणात हरवून जायला होतं. हे विद्यार्थी सासवड आणि पुरंदरचं नाव उंचावतील याबद्दल मला अजिबात शंका नाही.
भविष्यात पुरंदर तालुक्यात अनेक मोठमोठे प्रकल्प येत आहेत. त्यादृष्टीने नवीन पिढी तयार होत असल्याचे समाधानही शिवतारे यांनी व्यक्त केले.






