शिक्षण संस्थाचालक शिष्टमंडळ शिक्षण आयुक्तांच्या भेटीला
सह्याद्री माझा प्रतिनिधी हनुमंत वाबळे =
*शिक्षणसंस्थाचालक शिष्टमंडळ शिक्षण आयुक्तांच्या भेटीला.*
सध्या ११ वी, १२ वी चे प्रवेश (कला वाणिज्य व विज्ञान) सुरू आहेत. चौथी फेरी संपल्यानंतर ऑगस्टमध्ये वर्ग सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय बदलून जून अखेरीस कनिष्ठ महाविद्यालय सुरू करावीत. अशी मागणी संस्थाचालक शिक्षण मंडळ,
पुणे जिल्हा यांच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांच्याकडे करण्यात आली. याशिवाय २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास त्वरित शिक्षक कमी करण्याचा निर्णयाला स्थगिती द्यावी. असा प्रस्ताव मांडला.
पवित्र पोर्टल मधून होणारी शिक्षक भरती प्रक्रिया वर्षातून दोनदा राबविणे. यासारख्या मागण्यांना शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. शिष्टमंडळात आप्पासाहेब बालवडकर , संग्राम कोंडे – देशमुख, शिवाजीराव चाळक,सि.टी. कुंजीर, अजित वडगावकर व शांताराम पोमण सहभागी होते.






