डॉ. सुभाष तळेकर यांच्या कॅलिडोस्कोप ग्रंथाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
डॉ.सुभाष तळेकर यांच्या कॅलिडोस्कोप ग्रंथाचे प्रकाशन
सासवड : सर्व वाड्.मय प्रकारांना आणि प्रवाहांना एकत्र आणणारा कॅलिडोस्कोप हा ग्रंथ जागतिक पातळीवरील परिप्रेक्ष मांडणारा असून लेखकाच्या समग्र जीवन चिंतनाचे अनुभवविश्र्व शब्दबद्ध करणारा झाला आहे. व्यक्तिचित्रेफ, लघुकथा, बोधकथा ,निसर्ग चित्र ,चरित्र चित्र, इत्यादी वाड्.मय प्रकारांसह ललित व वैचारिक लेख या पुस्तकात सामावलेले आहेत. जीवनाच्या बहुतांशी अंगाना स्पर्श करणारे हे लेखन प्रगल्भ व मूल्यात्मक जाणिवेचे दर्शन घडवणारे झाले आहे ,असे प्रतिपादन डॉ श्रीपाल सबनीस यांनी कॅलिडोस्कोप या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या वेळी काढले.
डॉ.सुभाष तळेकर यांच्या स्वयं प्रकाशन, सासवड यांनी प्रकाशित केलेल्या कॅलिडोस्कोप ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. न.म. जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पवार ,प्रा .डॉ.दिगंबर दुर्गाडे ,प्रा. डॉ. संदीप सांगळे ,डॉ.सुभाष तळेकर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉक्टर न.म. जोशी म्हणाले, कॅलिडोस्कोप ही आशय संपन्न आणि लालीत्यपूर्ण कलाकृती आहे. सांस्कृतिक जीवनात प्रचंड उलथापालथ होत असताना, सांस्कृतिक मूल्यांची घसरण होत असतानाच्या काळात चांगल्या साहित्याची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर डॉ.सुभाष तळेकर यांचा कॅलेडिस्कोप हा ग्रंथ आशादायी वाटतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, रावसाहेब पवार, प्रा. डॉ.संदीप सांगळे यांनी पुस्तकासंबंधी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास ललिता सबनीस ,दिलीप निरगुडे, अण्णा खाडे, प्रा.डॉ. अरुण कोळेकर, कांचन तळेकर, कुंडलिक मेमाणे, प्राचार्य सय्यद ,सतीश पाटील, मोहन बागडे, केशव काकडे, उल्हास आढाव, दिनेश जगताप, प्रा. कर्नावट ,तानाजी सातव ,सौ देशपांडे ,कला फडतरे इत्यादी मान्यवर व पुरंदर कला मंच आणि आचार्य अत्रे वाचन कट्ट्याचे सभासद, रसिक साहित्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.सुभाष तळेकर यांनी केले. सूत्रसंचालन कवी अनिल कदम यांनी तर आभार संजय काटकर यांनी मानले.






