वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणांनी सलग तिसाव्या वर्षी स्वतंत्रता स्मारकाला अभिवादन – आझाद हिंद चे आयोजन
वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणांनी सलग तिसाव्या वर्षी स्वतंत्रता स्मारकाला अभिवादन.
प्रथम ध्वजारोहणाच्या स्मृती अक्षय वटवृक्षाने जतन केल्या.
सलग तिसाव्या वर्षी आझाद हिंदचे आयोजन.
बुलढाणा: स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविणारा दिपस्तंभ म्हणजे भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष होय. आजही अक्षय वटवृक्ष लाखो ज्ञात अज्ञात शहिद क्रांतिकारकांच्या स्मृती जतन करत आहे. 15 ऑगस्ट 1947 पासून जयस्तंभ चौक, बुलढाण्यातील स्वतंत्र भारताच्या प्रथम ध्वजारोहणाच्या स्मृती जपणारा अक्षय वटवृक्ष बुलढाणेकरांसाठी अद्वितीय वारसा आहे. असं मत 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त आयोजित चर्चासत्र अभिवादन कार्यक्रमातून उपस्थितांनी व्यक्त केले.
स्थानिक आझाद हिंद महिला संघटना, किसान ब्रिगेड, रमाई ब्रिगेड, रणरागिनी संघटना, जिजाऊ ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सलग तिसाव्या वर्षी जयस्तंभ चौकातील भारतीय स्वतंत्रता स्मारक,अक्षय वटवृक्ष या ठिकाणी सकाळी अभिवादन पर चर्चासत्राचे आयोजन केले होते.
स्वतंत्र भारताच्या स्मृती या विषयावर आयोजित अभिवादन पर चर्चासत्रात भारतीय स्वतंत्रता स्मारकाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा पूर्व इतिहास चर्चासत्रातून समोर आला. तर देशाच्या स्वातंत्र्याचा आणि शहीद क्रांतिकारकांच्या स्मृतींचा अद्वितीय वारसा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, क्रांती दिवस,23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीच्या अनुषंगाने वृद्धिंगत करण्याचा प्रयास आझाद हिंद सातत्याने करत आहे.
अभिवादन पर चर्चासत्रात सर्वप्रथम सामूहिक अभिवादन आणि पुष्पांजली समर्पित करून चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली होती. अनिताताई जाधव,रंजना पांडव,राधाबाई हूडेकर, सुरेखाताई निकाळजे,आशाताई गायकवाड,योगिताताई रोठे,उज्वला हूडेकर,गयाबाई राऊत,मीराबाई गवळी,उषाताई राऊत, कांता हूडेकर, कौसाबाई हूडेकर,पंचफुला गवई, अलका खांडवे,अँड.सतीशचंद्र रोठे, संजय एंडोले,असलम शाह, अफसर शेख, योगेश कोकाटे, मोहन सोळंके, यांसह जिल्ह्यातील साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, आयोजक संघटनांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. प्रजासत्ताक दिन चिरायू हो,वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी भारतीय स्वतंत्रता स्मारकाच्या स्मृतींना वंदन करीत राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.






