शैक्षणिक

समाजभानाची समज तरुणाईला जगण्याची नवी उमेद देते


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक ::

समाजभानाची समज तरुणाईला जगण्याची नवी उमेद देते

सासवड पतिनिधी: बापू मुळीक
एस.एन.डी.टी गृहविज्ञान महाविद्यालयांमध्ये एन.एस.एस.तर्फे ‘समाजभान आणि तरुणाई ‘ या विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधन संस्थेचे प्राध्यापक अमेय महाजन याप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना ‘तरुणाईला समाजभानाची जाणीव असणे त्यांच्या विकासाच्या टप्प्यामधील महत्त्वाचा बिंदू आहे’ याबाबत प्रतिपादन केले. २०४७ विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करताना भारत हा तरुणांचा देश असल्यामुळे तरुणांची यामधील भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

आपल्यामधील सामर्थ्य व क्षमता शोधून समाजासाठी व देशासाठी योगदान देणे यामध्ये
तरुणांनी सक्रियपणे सहभागी झालं पाहिजे याचे महत्व या ठिकाणी त्यांनी अधोरेखित केले.

एस.एन.डी.टी गृह विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये “तरुणाई व समाज भान ” याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सेमिनारला उपस्थित पालकांची स्वतःच्या पाल्याला संस्कारांची शिदोरी पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी विषद केली.

विकसित भारताचे स्वप्न साकारताना विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्था यांनी एकत्र येऊन प्रथम विद्यार्थ्यांचा सामाजिक, मानसिक , भावनिक इत्यादी विकास घडवण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी सुद्धा समाजभानाबद्दल जागृत राहून, नक्कीच कुटुंब, समाज व देशासाठी नावलौकिक होईल, अशी कामगिरी करू असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व पालकांनी उपस्थिती नोंदवली होती.
एस.एन.डी.टी एन. एस. एस युनिटचे झोनल कॉर्डिनेटर डॉ.अमर ढेरे,
त्याचप्रमाणे एन. एस. एस.
पी. ओ .डॉ.अंजली कदम, डॉ .सारिका बहिरट व सर्व स्टाफ
उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!