ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

थापेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चेअरमन पदी रोहित सोपान खवले यांची बिनविरोध निवड


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा ::

थापेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चेअरमन पदी रोहित सोपान खवले यांची बिनविरोध निवड

तालुक्यातील थापेवाडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित थापेवाडीचे चेअरमन राजाराम खवले यांची मुदत संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या

पदावर एकमेव अर्ज आल्यांने रोहित सोपान खवले यांची सोसायटीच्या चेअरमनपदी बिनिविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांनी जाहीर केले.

पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.गंगारामदादा जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली थापेवाडी भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी श्री.रोहित खवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

*यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन राजाराम खवले,व्हाईस चेअरमन चंद्रभागा खवले, संचालक हनुमंत खवले, संदिप खवले,लक्ष्मण खवले, शारदा खवले, बाळासो खवले, सरपंच रुपाली खवले, उपसरपंच सुरेश खवले, माजी सरपंच निलेश जगदाळे,

योगेश जगदाळे,दत्तात्रय भगवान जगदाळे, बाळासाहेब दूरकर,माजी उपसरपंच बाळासो रावडे, धोडीबा खवले, उत्तम खवले, अशोक खवले, गणेश खवले हे उपस्थित होते.*


Translate »
error: Content is protected !!