ताज्या घडामोडीपुणे

श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखीचे 23 जूनला सासवड येथून प्रस्थान


सह्याद्री माझा प्रतिनिधी::

श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखीचे 23 जूनला सासवड येथून प्रस्थान
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे सासवड येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरातून सोमवारी (दि. 23) जूनला सकाळी 11 वाजता प्रस्थान होणार आहे अशी, माहिती पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. जनार्दन (आप्पा) वाबळे यांनी दिली.

सोमवारी( दि. 23) जून ला सकाळी 11 वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या देऊळ वाड्यातून पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ होईल, त्यानंतर दुपारचा विसावा कुंभारवळण, एखतपुर, मुंजवडी ग्रामस्था तर्फे स्वागत, रात्रीचा मुक्काम श्री पारेश्वर मंदिर पारगाव मेमाणे येथे होईल. मंगळवारी (दि. 24 जून) वाघापूर चौफुला येथे सकाळचा विसावा होऊन,

दुपारी श्री विठ्ठल मंदिर डाळिंब येथे श्रीच्या रथाला मेंढ्यांचे पहिले गोल रिंगण होईल. तर श्री बोरमलनाथ मंदिर बोरी ऐदी येथे रात्रीचा मुक्काम होईल. बुधवारी (दि. 25) सकाळचा विसावा बोरी भडक आयटीआय हायस्कूल येथे व दुपारचा विसावा खामगाव फाटा आखाडे वस्तीत होईल. तर भैरवनाथ मंदिर यवत मध्ये रात्रीचा मुक्काम

होईल. गुरुवारी (दि. 26) सकाळचा विसावा श्री मारुती मंदिर भांडगावात तर दुपारचा विसावा विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरवंडला आणि पाटसच्या श्री नागेश्वर मंदिरात रात्रीचा मुक्काम होईल. शुक्रवारी( दि. 27) शितोळे वस्ती कुरकुभ एमाआयडिसी येथे सकाळचा विसावा तर रावणगाव येथे आश्वाचे पहिले गोल रिंगण होऊन, रावण गावात श्री हनुमान मंदिर येथे रात्रीचा मुक्काम होईल. शनिवारी( दि. 28)

राधवनवस्तीत मेंढ्यांची दुसरे गोल रिंगण होईल. दुपारचा विसावा विठ्ठल मंदिर काळभोर वस्तीत तर रात्रीचा मुक्काम श्री भैरवनाथ मंदिर भिगवण येथे होईल. रविवारी (दि. 29) सकाळचा विसावा मारुती मंदिर तक्रारवाडी तर डाळज नं. 2 कळस फाटा येथे दुपारचा विसावा आणि रात्रीचा मुक्काम श्री मारुती मंदिर डाळज नं. 1 येथे होईल.

सोमवारी (दि. 30) उदय हॉटेलमध्ये सकाळचा विसावा तर लोणी देवकर मध्ये दुपारचा विसावा होऊन, रात्री इंदापूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात मुक्काम होईल. मंगळवारी( दि. 1) विठ्ठल वाडी बोराटे वस्तीत सकाळचा विसावा दुपारचा विसावा वकील वस्ती येथे होईल. सराटीत निरा नदीवर गंगास्नान होऊन, रात्री अकलूज येथील श्री महादेव मंदिर येथे मुक्काम होईल.

बुधवारी( दि. 2) कुलकर्णी वस्तीत सकाळचा विसावा तर झगडे वस्तीत दुपारचा विसावा होऊन, बोडले मध्ये रात्री पालखी तळावर मुक्काम होईल. गुरुवारी( दि.3) सकाळचा विसावा बोडले येथे होईल. संभाजी जगताप यांच्यातर्फे पूजा होईल, दुपारचा विसावा विठ्ठल पादुका येथे होऊन, रात्री भंडीशेगाव मध्ये पालखीतळावर

मुक्काम होईल. शुक्रवारी (दि.4) सकाळचा विसावा बाजीराव विहीर येथे तसेच अश्वाचे दुसरे गोल रिंगण होऊन, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देव भेट होऊन, रात्री वाखरी येथे पालखी तळावर मुक्काम होईल. शनिवारी (दि.5) सकाळचा विसावा वाखरी येथे होऊन, श्री संत तुकाराम महाराज देव भेट तसेच दुपारचा विसावा इसबावी येथील पादुका मंदिर येथे आश्वाची उभे रिंगण व आरती होईल.

रात्री चांगटेश्वर मठ, पंढरपूर येथे मुक्काम होईल. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. जनार्दन (आप्पा) वाबळे, ह. भ.प. उपाध्यक्ष बापूसो जगताप, मुख्य चोपदार ह. भ. प. शशिकांत जगताप यांनी दिली.


Translate »
error: Content is protected !!