वनपुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी महामुनी यांचे आकस्मित निधन
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
उपसंपादक प्रा संदीप टिळेकर :
वनपुरीचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी नारायण महामुनी यांचे आकस्मिक निधन
पुरंदर तालुक्यातील वनपुरी गावचे रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि सुतार व्यवसायातून सर्वपरिचित असलेले शिवाजी नारायण महामुनी यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ५३ वर्षे होते. त्यांच्या निधनाने वनपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वनपुरी (ता. पुरंदर) येथील शिवाजी नारायण महामुनी हे सुतार व्यावसायिक म्हणून तसेच सामाजिक कार्यामुळे परिसरात परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, दोन बहिणी तसेच चुलते, पुतणे, भाचे, चुलत भाऊ-बहिणी असा मोठा परिवार आहे. मांडवी (ता. हवेली) येथील डॉ. प्रकाश महामुनी, माजी ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार संभाजी महामुनी आणि सामाजिक कार्यकर्ते तानाजी महामुनी यांचे ते बंधू होत.
शिवाजी नारायण महामुनी यांना सह्याद्री न्यूज नेटवर्क कडून भावपूर्ण श्रद्धांजली. Om Shanti.
दशक्रिया विधी रविवार दिनांक 19 जुलै रोजी सकाळी आठ वाजता मौजे वनपुरी महादेव मंदिर येथे होईल.






