पुरंदरचे सुपुत्र शुभम विजय बोरावके यांना डॉक्टरेट बहुमानाने गौरव; पुरंदर मध्ये अनेकांनी दिल्या शुभेच्छा
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
पुरंदरचे सुपुत्र शुभम बोरावके यांचा डॉक्टरेट बहुमानाने गौरव
पुरंदरचे सुपुत्र व एम.एम.आय.टी. पुणे जिल्हा अध्यक्ष शुभम विजय बोरावके यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड विद्यापीठा तर्फे मानाचा डॉक्टरेट बहुमान प्रदान करण्यात आला.
या निमित्ताने काळेवाडी येथील साई पॅलेस हॉटेल येथे भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार संजय जगताप मित्रपरिवार, अखिल भारतीय महात्मा समता परिषद पदाधिकारी तसेच शुभम बोरावके मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शुभम बोरावके यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. यामध्ये रक्तदान शिबिरे, महिलांसाठी मोफत शिवणकला, ब्युटी पार्लर व फॅशन डिझाईन प्रशिक्षण वर्ग तसेच इतर विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना माजी सरपंच किसन वाघोले यांनी केली. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुहास बापू लांडगे, माजी उपनगराध्यक्ष विजय वढणे,संजय टिळेकर, माजी नगरसेवक राऊत ,संतोष खोपडे, सागर जगताप, आबासाहेब भोंगळे, संतोष जगताप, चंद्रकांत हिवरकर, डॉ. धनंजय म्हेत्रे (पिंटू), राजेश शिंदे, पत्रकार सुनील लोणकर, नानासाहेब भोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आभार प्रदर्शन चंद्रकांत हिवरकर यांनी केले.






