ताज्या घडामोडीपुणे

वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकाकडून संयम आवश्यक सध्याची ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती महावितरण कर्मचाऱ्यांनी कॉल उचलल्यावर त्यांच्या जीवावर बेतु शकते


सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा::

वीज पुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकाकडून संयम आवश्यक सध्याची ग्रामीण व शहरी भागातील परिस्थिती महावितरण कर्मचाऱ्यांनी कॉल उचलल्यावर त्यांच्या जीवावर बेतु शकतो

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक अवकाळी वादळी पावसामुळे, ग्रामीण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मर बिघडणे, यामुळे अनेक ठिकाणी तासानतास अंधार पसरत आहे, अशा बिकट परिस्थितीत वायरमन आपला जीव धोक्यात

घालून, वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी,सतत झटत आहेत, काम करत असताना सारखे वीज ग्राहकांचे फोन येत आहेत, ते वायरमेनच्या जीवावर बेतू शकते, असे मत व्यक्त होत आहे. अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित आणि ग्राहकाकडून लाईट कधी येणार आहे, हे विचारण्यासाठी असंख्य फोन कॉल वायरमनला येत आहेत, वादळामुळे तारा तुटणे, शॉर्टसर्किट होणे, खांब वाकणे,

अशा घटना मुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. पावसात आणि वादळात ही एक परिस्थिती असताना, वायरमनला खांबावर चढून काम करावे लागते, कधी कधी ट्रान्सफॉर्मर मध्ये भिकाड होत आहे, तिथेही काम करावे लागते, हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागत आहे. हे काम अतिशय काळजीपूर्वक करावे लागत आहे,

हे काम करत असताना अनेक वीज ग्राहक वायर मला फोन करून वीज कधी येणार आहे ,असे विचारत असतात, त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, अशाप्रसंगी ग्राहकांनी वायरमनला सहकार्य करून, संयम बाळगणे, अपेक्षित आहे. त्यांच्या कामात सहकार्य करणे, ही जबाबदारी आपली आहे, हे सर्वांनी मान्य करणे गरजेचे आहे. पाऊस थांबताच, आम्ही तत्काळ घटनास्थळी पोहोचत

आहे, खांबावर चढून वायरमन हाताने हे काम करत असताना जीवावर बेतणारे आहे, अशावेळी नागरिकाकडून सतत फोन येतात, आणि फोन उचलू शकलो नाही ,तर काहींची नाराजी होते, मात्र फोन उचलण्याच्या घाईत अपघात होऊ शकतो, नागरिकांनी याबाबत संयम बाळगावा. गोविंद ठोंबरे, वायरमन सासवड शहर. आकाश शेडगे,

वायरमन ग्रामीण भाग पुरंदर. पुरंदर तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसापासून वादळी वाऱ्याचा सतत दार पाऊस पडत आहे, त्यामुळे पोल पडतात, किंवा तारा तुटत आहेत, त्यामुळे काम करताना वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. कामासंदर्भात (लाईनमन) वायरमन असून, त्यांना वारंवार फोन करणे टाळावे, अन्यथा काम करताना त्यांच्या जीवावर बेतू शकते. रोहित डामसे, अभियंता सासवड शहर. जीवन ठोंबरे, अभियंता राजेवाडी ग्रामीण पुरंदर.


Translate »
error: Content is protected !!