सासवड पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी सुनील रामचंद्र भिसे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::
लोणीकंद यवत सासवड या पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस खात्यामध्ये सेवा बजावताना अनेक गुन्ह्यांची उकल, सरकारी कामाची अचूक माहिती, गुन्हेगारांच्या वर असलेला वचक या सेवा पद्धतीने
काम करताना सासवड पोलीस स्टेशनचे फौजदार श्री सुनील रामचंद्र भिसे यांची खात्याअंतर्गत ग्रेड प्रमोशन 30 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे, या निवडीने पुरंदर तालुक्यातील
अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय सरकारी क्षेत्रातील मान्यवरांनी श्री सुनील भिसे यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
यावेळी आमच्या प्रतिनिधींनी पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून, कायदा व सुव्यवस्था चांगली होण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे त्यांनी सांगितले






