कोडीत ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गौरव भोसले यांची बिनविरोध निवड
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
कोडीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गौरव भोसले बिनविरोध
सासवड : पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागातील कोडीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गौरव विष्णुदादा भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
मावळते उपसरपंच प्रमोद बडधे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने कोडीत ग्रामपंचायतचे उपसरपंचपद रिक्त झाले होते,
त्यामुळे कोडीत बु, ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजनाताई खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली, ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी गुरुवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ठिक १० – ३० वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सरपंच
रंजनाताई खुटवड, मावळते उपसरपंच प्रमोद बडधे, ग्रामपंचायत सदस्या आशा किसन जरांडे संगिता सुरेश जरांडे, मनिषा प्रमोद बडधे, ग्रामपंचायत सदस्य विकास जरांडे ,अक्षय राजिवडे गौरव भोसले, ग्रामसेविका एस.डी. झगडे, ग्रामपंचायत कर्मचारी भानुदास खोमणे, सागर खोमणे, आदी उपस्थित होते,
उपसरपंच पदासाठी गौरव भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेविका एस. डी. झगडे यांनी गौरव भोसले यांची कोडीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली,
गौरव भोसले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांचे चिरंजीव आहेत, गौरव भोसले यांची कोडीत ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी
बिनविरोध निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे स्वागत व अभिनंदन केले जात आहे, उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना गौरव भोसले म्हणाले सरपंच रंजनाताई खुटवड व ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यामुळे मला उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली
आहे, सरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन, गावच्या सर्वांगिण विकासासाठी काम करेल अशी प्रतिक्रिया गौरव भोसले यांनी दिली,






