पुरंदर भूषण व वाणिज्य शाखा पुस्तकांचे निष्णांत लेखक प्रा सुभाष जगताप यांचा अमृत महोत्सवी सत्कार व कृतज्ञता समारंभ संपन्न
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे
::–
*पुरंदर भूषण व वाणिज्य शाखा पुस्तकांचे निष्णांत लेखक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक सुभाष महादेव जगताप यांचा अमृत महोत्सवी सत्कार व कृतज्ञता समारंभ आज रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला,
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा सुरेश मेहता माजी अध्यक्ष संचालक लक्ष्मी को-ऑपरेटिव बँक पुणे,* *श्री कल्याणराव सस्ते अध्यक्ष के जे इन्स्टिट्यूट पुणे, पुरंदर हवेलीचे आमदार श्री विजयबापू शिवतारे ,* *माजी आमदार श्री संजय जगताप, भाजपाचे नेते बाबाराजे जाधवराव, श्री विजय कोलते,प्रा केशव काकडे ,*
*बाळासाहेब भिंताडे, श्री बंडूकाका जगताप, इस्माईल सय्यदसर प्रदीप अण्णा पोमण, एडवोकेट अविनाश भारंबे , श्री विलास काका जगताप जगताप,भुजंग जगताप, अंकुश जगताप,विश्वास गुरव, दत्ता नाना जगताप, संजय पवार डॉ ममता शिवदीप लांडे,कला
फडतरे,सिमा अनपट मोरे ,मिना भोंगळे ,* *लता जाधव, बाळासाहेब सोनवणे,विलास चव्हाण, विक्रम डोंगरे, सुधाकर गिरमे , रमेश वामनराव जगताप,यांच्या उपस्थितीमध्ये हा कृतज्ञता सोहळा पार पडला ,
*यावेळी प्रा सुभाष जगताप यांच्या काळातील अनेक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते, यावेळी अनेकांनी सरांच्या विषयी संवेदना व्यक्त करताना शिस्तप्रिय शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक अशा अनेक पैलूंचा उलगडा करत सरांच्या विषयी आत्मीयता व्यक्त केली,
या कार्यक्रमाचे आयोजन फ्रेंड्स अकाउंट अकॅडमी तालुका पुरंदर जिल्हा पुणे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी केलं होतं, प्रस्तावना अविनाश भारंबे, व श्री बंडू काका जगताप यांनी स्वागत केले, विलास काका जगताप यांनी सुत्रसंचलन केले, विस्वास गुरव यांनी पाद्यपूजा केली,*






