ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तरतूद करा विधानसभेतील अर्थसंकल्पावरील भाषणात विजय शिवतारे यांची मागणी


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा ::::

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तरतूद करा
अर्थसंकल्पावरील भाषणात शिवतारे यांची मागणी

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून नावारूपाला येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलेले आहे.

मात्र अर्थसंकल्पात त्यावर तरतूद केलेली दिसत नाही. आपल्या उत्तराच्या भाषणात याबाबत स्पष्टता करावी असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या भाषणात केले आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत ते बोलत होते.

शिवतारे म्हणाले, माझ्या मतदारसंघातील गुंजवणी प्रकल्पाला अतिशय तुटपुंजी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अशा तरतुदीतुन प्रकल्पाचे काम अनेक वर्ष चालेल. कऱ्हा आणि नीरा या दोन नद्या जोडून बारामती व पुरंदरच्या जिरायत भागाला पाणी देणारी

योजना मी प्रस्तावित केलेली आहे. त्याबाबतही आपल्या उत्तराच्या भाषणात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जनतेला आश्वस्त करावे. मुख्यंत्री लाडकी बहीण योजनेतून आपण महिलांना अर्थसहाय्य करीत आहोत. मात्र महिलांना कायमस्वरूपी सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने

प्रयत्न व्हायला हवेत. रेडीमेड गारमेंट उत्पादनात भारताचा वाटा केवळ ३ टक्के आहे. बांगलादेश सारख्या देशाचा वाटा १७ टक्के आहे. १००० मशीनचा एक रेडीमेड गारमेंट प्रकल्प उभारायला साधारणपणे

४० कोटी रुपये खर्च येतो. त्यातून ३५०० महिलांना रोजगार मिळतो. राज्यभर असे प्रकल्प केल्यास महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. याचाही आपण विचार करावा असेही शिवतारे यांनी सांगितले.

*आयटी पार्कबाबत निर्णय घ्या*

पुणे शहरातून आयटी कंपन्या बंगलोर व अन्यत्र स्थलांतर करीत आहेत. त्यांना पुरंदर तालुक्यात हजारो एकर गायरान जागा आम्ही उपलब्ध करून दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे

यांनी याबाबत उद्योग विभागाला आदेश दिलेले आहेत. पुरंदरला रस्ते, रेल्वे आणि विमानतळासह मुबलक पाणी आणि वीज उपलब्ध आहे. शासनाने याबाबतही तातडीने कार्यवाही करावी असे शिवतारे यांनी म्हटले.


Translate »
error: Content is protected !!