मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा ) शनिवारी सात जून रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली
मुख्य संपादक हनुमंत वाबळे सह्याद्री माझा::
मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी (दि.७ जून) मोठ्या उत्साहात साजरी केली.
शहरातीत कुंजीर वाडा येथे सकाळी ८:३० वाजता ईदची नमाज मौलाना शमशेद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सासवड शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली.
देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली ईदनिमित्त प्रमुख नमाज पठण पावसाच्या वातावरणामुळे ईदगाह मैदान येथे न होता सासवड येथील कुंजीरवाडा टाऊन हॉल येथे झाले मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या
पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून सासवड शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता






