श्रीलंका या ठिकाणी बॉक्सिंग कोर्स साठी मनोहर ताथवडकर यांची निवड
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा;;
श्रीलंका या ठिकाणी बॉक्सिंग कोर्स साठी मनोहर ताथवडकर यांची निवड
श्रीलंका या ठिकाणी बॉक्सिंग कोर्स साठी मनोहर ताथवडकर यांची निवड सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
श्रीलंका बॉक्सिंग असोसिएशन राष्ट्रीय गव्हर्नन्स बॉडी बॉक्सिंग श्रीलंका आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन यांच्या निमंत्रणावरून कोलंबो श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी कोर्ससाठी सासवड येथील रहिवासी आंतरराष्ट्रीय पंच मनोहर ताथवडकर यांची निवड केली आहे. भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून, मनोहर ताथवडकर यांनी हजेरी लावली असून,
आशिया खंडातील 23 देशातील राष्ट्रीय पंच, तांत्रिक अधिकारी यांना कोर्ससाठी निमंत्रित केले होते, पण त्यांच्या व तांत्रिक अधिकारी बॉक्सिंग यांच्या कामगिरीत सुधारणा व्हावी, जागतिक पातळीवर त्यांना काम करता यावे, यासाठी हा कोर्स असोसिएशन बॉक्सिंग
चॅम्पियनशिप कोलंबो येथे 12 मे 2025 ते 15 मे 2025 या काळात आयोजित केला होता, मनोहर ताथवडकर हे बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय पंच असून, 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स सपधॅत त्यांचा सहभाग होता. अनेक राष्ट्रीय व इतर स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी काम केले आहे.






