ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरंदरची सीताफळ ही 250 किलो!!’ तर शेतकऱ्यांचा आनंदोत्सव


सह्याद्री माझा
पुरंदरची सीताफळे ही 251 किलो; तर शेतकऱ्यांचा आनंदोत्सव

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक सीताफळासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने, यंदा पंधरा दिवस अगोदरच हंगाम सुरू झाला आहे. परिणामी गुलटेकडी मार्केट यार्ड आतील फळ बाजारात सीताफळे दिसू लागली आहेत,

पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील 21 किलो सीताफळाची आवक झाली. घाऊक बाजारात त्यांच्या किलोला 251 रुपये भाव मिळाला.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांच्या जय शारदा गजानन या गाळ्यावर ही आवक झाली असून, काळेवाडी येथील शेतकरी दादा काळे यांच्या शेतातून ही सीताफळे बाजारात

दाखल झाली, त्याचा सुबोध झेंडे यांनी खरेदी केली. आंब्याचा हंगाम संपत आल्यानंतर, नागरिक आवर्जून सीताफळाची वाट पाहत असतात, हवेली, पुरंदर, शिरूर, तालुक्यासह अहिल्यानगर, सातारा जिल्ह्यातून आवक होत असते, सध्या दाखल झालेल्या सिताफळाला

घरगुती ग्राहकाकडून, मागणी आहे. मात्र अलीकडच्या काळात ज्यूस विक्रेते, पल्प सह, विविध प्रक्रिया, उद्योगाकडून मागणी वाढली आहे. आवक वाढून भाव कमी झाल्यानंतर, त्यांच्याकडून खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सीताफळाचे व्यापारी माऊली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली. यंदा पाऊस लवकर सुरू

झाल्याने, उत्पन्न चांगले होणार आहे. जानेवारीअखेरपर्यंत सीताफळांचा हंगाम सुरू राहणार आहे. सीताफळाचे तीन भर असतात, त्यापैकी पहिल्या बहराची ही आवक आहे, हळूहळू आवक वाढणार आहे. सीताफळासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने, तीनही भरात चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. दादा काळे, शेतकरी काळेवाडी पुरंदर.


Translate »
error: Content is protected !!