सासवडच्या छत्रपती शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने संपन्न झाल्या क्रिकेट स्पर्धा
सह्याद्री माझा
सासवडच्या छत्रपती शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने संपन्न झाल्या क्रिकेट स्पर्धा..
सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक सध्या तरुणाई उन्हाळ्याच्या सुट्टीचा
आनंद घेत आहे याच पार्श्वभूमीवर सासवड येथील छत्रपती शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नुकत्याच भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुरंदरच्या विविध भागातील सुमारे
वीसहून अधिक संघांनी यात सहभाग घेतला. सासवड येथील वीरफाटा नजिकच्या पुरंदरेश्वरा क्रिकेट क्लबच्या मैदानावर या स्पर्धा ११ व १२ मे रोजी पार पडल्या. मंडळाच्या वतीने प्रथम क्रमांकास ११ हजार १११ रुपये , दुसऱ्या क्रमांकासाठी ७ हजार ७७७ रुपये तर तृतीय क्रमांकास ४ हजार ४४४ रु. व करंडक अशा स्वरुपातील बक्षिसे ठेवण्यात आली होती
सदरच्या स्पर्धेत कोडीत गावच्या नाथसाहेब ग्रुप यांनी प्रथम क्रमांक, सासवडच्या सीजीएस ग्रुप यांनी द्वितीय तर माहूर गावच्या दुर्गामाता क्रिकेट क्लबने तिसरा क्रमांक पटकावला. दोन दिवसांच्या या स्पर्धेत अनेक संघांनी नेत्रदीपक खेळ केले. छत्रपती शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या सर्धेचे सुंदर नियोजन केले.






