सासवड नगरपालिका वज्र पुरंदर फाउंडेशन व पुरंदर पोलीस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक संकलन व स्वच्छता मोहीम
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::
सासवड नगरपालिका वज्र पुरंदर फाउंडेशन व पुरंदर पोलीस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक संकलन व स्वच्छता मोहीम
सासवड प्रतिनिधी: – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सासवड नगरपालिका व वज्र पुरंदर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर मंदिर परिसरात भव्य प्लास्टिक संकलन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
ही मोहीम संयुक्त राष्ट्र संघाच्या UNEP जाहीर केलेली थिम नुसार – जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन ( ending plastic pollution globally ) संकलन उपक्रमाअंतर्गत पार पडली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्य सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली कार्यक्रमाचे आयोजित केले गेले .आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, शहर समन्व्यक राम कारंडे यांनी सदर कार्यक्रमात सर्वांना हरित शपथ दिली.सदर कार्यक्रमात 25 kg प्लास्टिक संकलन करण्यात आहे. संगमेश्वर मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
वज्र पुरंदर फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप शेठ राऊत, उपाध्यक्ष योगेश आबा जगताप, सचिव अॅड. सतीश राणे साहेब, सभासद अॅड. सौरभ वढणे साहेब, अॅड. बाबासो पिलाने साहेब, अतुल काका निगडे, धीरज शेठ जगताप, नंदकुमार चव्हाण साहेब , संदीप आप्पा घारे, नानासाहेब काळे, श्लोक घारे, नानासाहेब बडदे आणि अमोल रणदिवे या सर्व मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
पुरंदर अकॅडमीचे हेमंतकुमार शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग घेत मंदिर परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी प्लास्टिकमुक्त परिसरासाठी शपथ घेतली. नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊन पर्यावरण रक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.






