ताज्या घडामोडीपुणे

रिसे पिसे –नायगाव प्रवास चिखलामुळे अवघड, चिखलामुळे विद्यार्थी ,शेतकरी यांचं अतोनात नुकसान प्रशासन झोपले आहे काय नागरिकांचा प्रश्न ?


पुरंदर प्रतिनिधी बापू मुळीक:::

रिसेपिसे ते नायगाव प्रवास चिखलामुळे अवघड झाला; त्यासाठी अद्याप पर्यंत मुरूम टाकला नाही

सासवड प्रतिनिधी: सासवड सुपा या राज्य मार्गाच्या रस्त्याचे काम चालू आहे, परंतु मे मध्ये पाऊस झाल्याने, या रोडची माती मिश्रित असल्यामुळे, रिसेपिसे ते नायगाव पर्यंत रस्त्यावर चिखल झाला आहे, त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना खूप अडचणीतून मार्ग काढावा लागत आहे.

अनेक दिवसापासून सासवड सुपा या मार्गाचे सासवड पासून ते रिसेपिसे पर्यंत रस्ताची अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळे, चांगल्या पद्धतीचे काम करण्याची सर्वसामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या तरी या रस्त्याची रुंदीकरण होऊन, कॉंक्रिटचा रस्ता होत आहे. या मार्गावरील रिसेपिसे ते नायगाव या तीन गावातील आठ किलोमीटर अंतर असताना, रस्ते कामासाठी खोदाई करण्यात आली आहे, तसेच रुंदीकरण करूनही, त्यावर रोलिंग करण्यात आलेले आहे.

परंतु महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यापूर्वीच त्यावर मुरमीकरण करणे गरजेचे होते ते अद्याप पर्यंत मुरमीकरण झाले नाही. शाळा, कॉलेज चालू झाली आहेत, या अगोदर रिसेपिसे, राजुरी, नायगाव, पिसर्वे येथील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांनी, मीडियामधील प्रतिनिधींनी आवाज उठवला परंतु, राजपथ इन्फ्रा कंपनीने अद्याप पर्यंत कुठलीही दाद दिली नाही. त्यामुळे सासवड सुपा एस.टी महामंडळ काही दिवस बंद होती, परंतु पुन्हा एकदा सासवड ते नायगाव पर्यंत चालू झाली.

यामुळे नायगाव च्या पुढच्या गावांना राजुरी, रिसेपिसे येथील प्रवासी, शेतकरी, नोकरदार यांना नहाकतेचा त्रास म्हणून अक्षरशा: नायगाव ,माळशिरस राजुरी, रिसेपिसेचे असा प्रवास करावा लागत आहे. याबद्दल अद्याप पर्यंत पुरंदरचे लोक प्रतिनिधी काही बोलत नाही, रस्त्याचे काम बंद आहे ,मुरमीकरण अद्याप पर्यंत करू शकत नाही, कंपनीला कुठल्याही प्रकारच्या सूचना दिल्या नाहीत. परंतु आज चागावटेश्वर पालखी सोहळा प्रमुख सासवड जनार्दन वाबळे हे सुपा रिसेपिसे, राजुरी नायगाव पर्यंत प्रवास करताना खूप नाहकतेचा त्रास त्यांना झाला.

त्यांनी त्वरित मीडियामधील पत्रकारांना फोन केला असता, नागरिकांची खूप दयनीय अवस्था या भागातील आहे, या ठिकाणी रस्त्यावरून प्रवास कसा करायचा हा मला स्वतः आज अनुभव आला, तर नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, कसा प्रवास करून, आपल्या घरी जात आहेत, हे तर मला खूप अवघड परिस्थिती दिसत आहे. त्यांनी त्वरित पत्रकारांच्या माध्यमातून प्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ यांच्याशी फोनवरून संवाद करून, प्रत्यक्ष सासवड येथे भेट घेऊन,

सर्व हकीगत सांगितली, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित फोन करून, राजपथ इन्फ्रा कंपनीने काम चालू त्वरित करावे व त्यावर मुरमीकरण करून, रस्त्याच्या ठिकाणी प्रवासासाठी खुला करून देतो असे सांगण्यात आले. यामुळे रिसेपिसे, राजुरी येथील विद्यार्थी यांना चिखलमय रस्त्यामुळे, सासवड या ठिकाणी रूम घेण्याची वेळ ही केवळ राजपत इन्फ्रा कंपनीमुळे आली. यासाठी पुरंदरचे लोकप्रतिनिधी काही बोलत नाही, हे बरोबर नाही, दोन महिन्यात रिसेपिसे, राजुरी करांची

प्रवासाची दयनीय अवस्था जी झालेली आहे, त्याला पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी सर्वस्वी जबाबदार आहेतच, त्याबरोबर राजपथ इन्फ्रा कंपनी सुद्धा या ठिकाणी जबाबदार आहे. परंतु आज जागृतपणे चागावटेश्वर पालखी सोहळ्याचे प्रमुख जनार्दन वाबळे व पत्रकारांच्या माध्यमातून आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, राजपथ इन्फ्रा कंपनीला आदेश देऊन, त्वरित काम चालू करावे, मुरमीकरण करावे. प्रवास सुखकर करावा. एस.टी सुप्यापर्यंत चालू व्हावी,

नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड करू नये,बंद असलेले काम त्वरित चालू करावे. असा आदेश प्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी प्रणोती श्री माळ यांनी राजपथ इनफा कंपनीला दिले. शेवटी आज पालखी सोहळा प्रमुख चांगावटेशवर जनार्दन वाबळे व पत्रकार यांच्यामुळे चालू होत आहे.


Translate »
error: Content is protected !!