ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुसंघाने सासवडच्या पालखीतळास ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांची भेट


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
सासवडच्या पालखी तळाची ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे ची भेट

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा सासवड (ता. पुरंदर) येथे दि. 22 व 23 जून असे दोन दिवस मुक्कामी येत आहेत. 24 जूनला हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. त्यानिमित्त शासनातर्फे जयकुमार गोरे मंत्री सासवड येथे पालखीतळाची पाहणी करत असताना, बोलताना म्हणाले की, शासन दरबारी प्रश्न मांडणार नाही,

तर शासन म्हणून स्वतः आलो आहे. दोन दिवसापासून पालखीची पाहणी करत आहे, प्रत्येक वर्षी नवीन अडचणी निर्माण होतात,पालखी वर्षानुवर्ष येत आहे, त्यावर आढावा म्हणून मार्ग काढणे हे, शासनाचे कर्तव्य आहे. पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पालखी स्थळांचे नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांची ही मोठ्या प्रमाणावर घरे, विविध प्रकारच्या स्वरूपांचे वस्तू,शेतीची जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.

परंतु लवकर पाऊस आल्यामुळे, यावर्षी वारकरी यांची संख्या लक्षणीय असणार आहे. त्यासाठी हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी वारकऱ्यांना सुविधा व्यवस्थित मिळाव्यात, यासाठी ग्रामविकासतर्फे साडेसात लाख स्क्वेअर फुटाचा हँगर चा मंडप, हा आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत या सुविधा देणार आहोत. महिलासाठी स्वच्छतागृह, स्नानगृह, अशा सुविधा पुरविल्या जाणार आहे,

आनंदमय वातावरणात वारकऱ्यांसाठी सुविधा पुरवल्या जाणार आहोत, पालखी मार्ग एवढा सुंदर होत आहे की, तो कौतुकास्पद आहे, तसेच पालखीची ठिकाणी विकसित करण्याचे ध्येय आहे, यावर्षी जी अडचण येते ती पुढच्या वर्षी वेगळीच अडचण निर्माण होत राहत असते, पालखी ज्या ज्या ठिकाणी थांबेल, त्या ग्रामपंचायतीला खर्च हा शासनातर्फे नक्की मिळेल, 300 टँकरने आळंदी ते पंढरपूर पर्यंत पाण्याची सोय ही शासनातर्फे केली जाणार आहे.

असेही गोरे यांनी सांगितले. यावेळी आमदार राहुल कुल, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा भाजप गंगाराम जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाजप जालिंदर कामठे, दक्षिण पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, सासवड शहराध्यक्ष भाजप आनंद जगताप, महादेव शेंडकर, पुरंदर तालुका शिवसेना अध्यक्ष हरिभाऊ लोळे, पुरंदर तालुका भाजप दिलीप आप्पा कटके,

गणेश मुळीक, अमोल जगताप, विजय वढणे, एडवोकेट शिवाजी कोलते, एडवोकेट नितीन कुंजीर, एडवोकेट श्रीकांत ताम्हाणे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ,

नायब तहसीलदार सोनाली वाघ ,बांधकाम विभाग अभियंता स्वाती दहिवाल, पालिका आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, अजित जगताप, सुहास लांडगे, माजी नगरसेवक सासवड नगरपरिषद, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, कर्मचारी, पत्रकार, आदी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!