जवळार्जुन ग्रामपंचायत च्या सरपंच पदी अजिंक्य टेकवडे यांचे बहुमताने निवड
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
जवळार्जुन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अजिंक्य टेकवडे यांची बहुमताने निवड….
पुरंदर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेचे व तालुक्याच्या राजकारणाची केंद्रबिंदू व शक्तिस्थान मानल्या जाणाऱ्या जवळार्जुन ग्रामपंचायतच्या मध्यवर्ती निवडणुकीमध्ये सरपंच पदी अजिंक्य अशोक टेकवडे यांची
बहुमताने निवड करण्यात आली. माजी सरपंच सोमनाथ कणसे यांनी सरपंच पद स्वीकारल्यापासून मनमानी कारभार करणे, वरिष्ठांचे आदेश न पाळणे, इत्यादी पद्धतीने मनमानी कारभार सुरू केला होता. त्या विरोधात उर्वरित सदस्यांमध्ये तीव्र नाराजी होती याबाबत त्यांनी
विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या वेळी पुणे आयुक्तांनी त्यांना सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकले होते. आज युवा नेते अजिंक्य अशोक टेकवडे यांची जवळार्जुन
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी जवळार्जुन गावचे आधारस्तंभ व आदरणीय श्री.आप्पासाहेब (माऊली नाना) मारुती राणे व पुरंदरचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांचे मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी बहुमताने निवड केली.यावेळी विद्यमान ग्रामपंचायत प्रभारी सरपंच सौ प्रतिभाताई निलेश राणे सदस्य सौ शितलताई सतीश
साळुंखे सौ संगीता ताई शिवाजी टेकवडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीचे ग्रामस्थ व सर्वांनीच स्वागत केले व आनंदोत्सव साजरा केला. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय बडदे यांनी सरपंच पदाचे नियुक्तीपत्र सुपूर्त करून अभिनंदन केले.






