ताज्या घडामोडीराजकीय

दिवे गावच्या सरपंच पदी रुपेश राऊत यांची बिनविरोध निवड, माजी कृषी राज्यमंत्री ज्येष्ठ नेते दादासाहेब जाधवराव यांनी दिल्या शुभेच्छा


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:

दिवे गावच्या सरपंचपदी रुपेश राऊत यांची बिनविरोध

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक दि.१० दिवे (ता.पुरंदर) गावचे सरपंच शोभा दिलीप झेंडे यांचा नेमून दिलेला कालावधी संपल्यामुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी रुपेश दत्तात्रय राऊत यांची दिवे गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी जाहीर केले.

सहाय्यक निवडुक निर्णय अधिकारी म्हणुन रश्मी सांगळे व तलाठी भाऊसो सुतार यांनी काम पाहिले.
भाजपा नेते बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते सरपंच रुपेश राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच शोभा झेंडे,योगेश काळे,गुलाब झेंडे,अमित झेंडे, उपसरपंच सुमन टिळेकर,ग्रामपंचायत सदस्य राजाराम झेंडे, भारती आढाळगे,श्रद्धा काळे ,सुजाता जगदाळे, शोभा लडकत,शोभा टिळेकर, निलेश जाधवराव राजलक्ष्मी पवार ,सुभाष पवार, मनोज क्षीरसागर, विशाल पवार, राजेंद्र लांडगे उपस्थित होते.

सरपंच निवडप्रसंगी युवानेते बाबाराजे जाधवराव , माजी जिल्हा परिषद सदस्य संगिता काळे, साधना सहकारी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र काळे,सरस्वती कार्यालयाचे मालक बाळासो काळे, चेअरमन गणपत शितकल, माजी सरपंच बापूसो राऊत, , बापूसो टिळेकर,अँड. बबनराव लडकत, अविनाश झेंडे ,अतुल जाधव,

युवराज जाधवराव , विठ्ठल जाधवराव,मोहन जाधव, रमाकांत काळे, रेवणनाथ जाधव ,नाना पाटील, नामदेव झेंडे, परशुराम राऊत, रोहिदास तळेकर ,दादा राऊत, रोहिणी राऊत,अशोक कुंभार आदींसह दिवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी सैनिक व माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव व युवानेते बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचा भरीव निधी आणून दिवे गावचा सर्वांगीण विकास जलद गतीने करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रुपेश राऊत यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणपत शितकल यांनी केले. सूत्रसंचालन रामभाऊ झेंडे यांनी केले. आभार गुलाबतात्या झेंडे यांनी मानले


Translate »
error: Content is protected !!