जवळार्जुनचे माजी सरपंच कै आप्पासाहेब मारुती राणे यांच्या जयंतीनिमित्त विविध सार्वजनिक उपक्रमाचे आयोजन
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा नवनाथ राणे::
जवळार्जुन चे मा. सरपंच कै. आप्पासाहेब मारुती राणे माऊली नाना यांच्या जयंती निमित्त विविध सार्वजनिक उपक्रमांचे आयोजन माऊली नाना ट्रस्ट च्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव शिवाजी आप्पासो राणे अध्यक्ष तंटामुक्ती जवळार्जुन यांच्या वतीने गावामध्ये वृक्षारोपण तसेच प्राथमिक शाळा हायस्कूल व जवळार्जुन मधील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
तसेच गरजू शेतकऱ्यांना धान्याची कोटी वाटप करण्यात आली. तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जवळार्जुन विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन महेशजी राणे न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन चे मुख्याध्यापक निगडे सर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी राणे, सामाजिक कार्यकर्ते शेखर टेकवडे,
गणेश राणे, अशोक राणे, भीमराव महाराज सूर्यवंशी, मोहन टेकवडे, प्रशांत राणे, अमोल टेकवडे, नागेश टेकवडे, अतुल टेकवडे, बंडू टेकवडे, शरद राणे, प्रमोद टेकवडे, सचिन राणे, सतीश राणे, सोमनाथ निंबाळकर, सुजित राणे, शरद दोडमिसे, दीपक राणे, पंकज टेकवडे, व पत्रकार नवनाथ राणे
व इत्यादी मान्यवर उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल जवळार्जुन प्राथमिक शाळा जवळार्जुन, प्राथमिक शाळा राणे वस्ती, अंगणवाडी जवळार्जुन, अंगणवाडी विठ्ठलवाडी या सर्व विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.






