ताज्या घडामोडीपुणे

पुरंदर तालुक्यात पंचायत समिती येथे गट विकास अधिकारी म्हणून प्रणोती श्रीमाळ यांची नियुक्ती


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

पुरंदर तालुक्यात पंचायत समिती पुरंदर येथे गटविकास अधिकारी म्हणून प्रणोती श्रीमाळ यांची नियुक्ती

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक
पुरंदर तालुक्यातील पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी म्हणून प्रणोती श्रीमाळ यांच्या नियुक्ती करण्यात आला आहे नवनियुक्त पदभार स्वीकारल्यानंतर पंचायत समिती मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे वतीने विविध प्रश्नांवर चर्चा केली व कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रणोती श्रीमाळ यांनी सांगितले.

दि.20 जून पासून श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पर्यंत पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.तरी पुरंदर पंचायत समितीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहन पुरंदर पंचायत गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ यांनी सांगितले विशेषतः ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहीर मध्ये कर्मचारी यांनी पिण्याच्या पाण्यामध्ये टीशल पावडरचा वापर करणे,

अशी सूचना नवनियुक्त गटविकास अधिकारी प्रणोती श्रीमाळ यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानोबा घोणे, व पुरंदर तालुका अध्यक्ष मनोहर बाराभाई, सचिव तुकाराम कांबळे, विजय नारगे, अनिल गोफणे,भगत, थोपटे, विविध ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!