ताज्या घडामोडी

सासवड मध्ये अनोख्या पद्धतीने ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा, अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवडमध्ये अनोख्या पद्धतीने ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा

सासवड, प्रतिनिधी : श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था व ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार यांच्या विरंगुळा केंद्रावर सासवड येथे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

सरकारी नियमानुसार पूर्वीच्या काळात अनेक नागरिकांच्या शालेय दाखल्यांवर १ जून ही जन्मतारीख नोंदविण्यात येत असे. त्यामुळे सरकारी तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस १ जून रोजी साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सासवडमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी तुकाराम बापू गिरमे, ज्ञानेश्वर कामथे, दिवाणजी कामथे, बाळासाहेब शेवते, सुनील लक्ष्मण कावडे आणि शंकर हिवरकर या ज्येष्ठांचा वाढदिवस केक कापून व शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी ज्येष्ठांच्या दीर्घायुष्याची व उत्तम आरोग्याची सदिच्छा व्यक्त केली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सासवडकरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


Translate »
error: Content is protected !!