ग्राहक चळवळ स्वानंदासाठी वाढली पाहिजे – इंद्रजीत देशमुख सासवडमध्ये ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
ग्राहक चळवळ स्वानंदासाठी वाढली पाहिजे ! : इंद्रजित देशमुख
24 डिसेंबर ग्राहक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन तहसील कचेरी पुरंदर व ग्राहक कल्याण फाउंडेशन यांच्या सहकार्याने सासवड येथे 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर या दरम्यान ग्राहक जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात
आले होते या सप्ताह दरम्यान माध्यमिक विद्यालय यादव वाडी न्यू इंग्लिश स्कूल पांगारे व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे हायस्कूल दिवेयेथील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सोनोरी उदाचीवाडी वनपुरी शिवरी तसेच सासवड
येथील वाघिरे कॉलेज व पुरंदर कॉलेज या ठिकाणी समक्ष भेटी देऊन ग्रामस्थांशी व विद्यार्थ्यांची प्रकट चर्चा केली व ग्राहक चळवळीचे महत्त्व समजावून सांगितले .दिनांक 30 डिसेंबर रोजी सासवड येथील नवीन प्रशासकीय भावनांमध्ये समारोपाचा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी माननीय इंद्रजीत
देशमुख सरांचे ग्राहक चळवळ उपयुक्तता व अंमलबजावणी या विषयावर उद्बोधक व्याख्यान झाले व्याख्यान ऐकण्यासाठी सासवडकर तसेच तालुक्यातील नागरिकांनी उस्फुर्त गर्दी केली होती याप्रसंगी बोलताना इंद्रजीत देशमुख यांनी ग्राहक चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागेल .तरीही ठाम आत्मविश्वासाची गरज
असल्याचे प्रतिपादन केले .ग्राहक कल्याण फाउंडेशन चे राज्य अध्यक्ष ह भ प तुकाराम महाराज निंबाळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर दौंड पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाबद्दल मनोगत व्यक्त केले
.राज्य ग्राहक आयोगाचे सदस्य विकास महाजन यांनी ग्राहक हक्क कायदा 2019 यावर भाष्य केले .पुरंदर तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष रामदास मेमाणे व उपाध्यक्ष बबनराव काळे कोषाध्यक्ष उत्तमराव झेंडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले .महिला अध्यक्ष छायाताई नानगुडे परविन पानसरे संतोष एकनाथ जगताप दशरथ विठ्ठल
जगताप धनंजय जगताप रवींद्र ताकवले बाळासाहेब मुळीक सतीश साकोरे कामठे महाराज सतीश थिटे यासह तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव नायब तहसीलदार संदीप पाटील तसेच पुरवठा अधिकारी व त्यांचे सहाय्यक व विविध खात्यांचे अधिकारी वर्ग उपस्थित होता .सूत्रसंचालन संतोष काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष मगर यांनी केले .






