राजकीय

जेजुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक उत्साहात संपन्न


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
जेजुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उत्साहात बैठक

जेजुरी (ता. पुरंदर) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक श्री स्वामी समर्थ चित्र मंदिर येथे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.

या बैठकीत होऊ घातलेल्या जेजुरी नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीत जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर भाऊ कामठे, कात्रज दूध संघाचे व्हाइस चेअरमन तानाजी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष उत्तम बापू धुमाळ आणि वामन तात्या जगताप यांनी आपले विचार मांडले.

यावेळी जि.प. सदस्य विराज काकडे, प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, माजी नगराध्यक्ष मोहन दादा महाजन, रोहिदास कुंभार, अविनाश भालेराव, माजी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, रमेश बयास, माजी नगरसेवक भारत शेरे, दिंगबर उबाळे, अलिमभाई बागवान, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला तालुकाध्यक्षा वंदनाताई जगताप, उपाध्यक्षा नलिनी ताई कामठे, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक शांताराम कापरे, जिल्हा युवक अध्यक्ष अमित झेंडे, सनी झगडे, बंटी निकुडे, संदिप घोणे, सुनील कामथे, संजय नाकाडे, घनश्याम लाखे, छबन कुदळे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जेजुरी शहर अध्यक्ष रमेश लेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे पाटील यांनी मानले.


Translate »
error: Content is protected !!