अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मुख्य संपादक सह्याद्री माझा:
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोढरे यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार जाहीर
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मराठा समाजाचे गाढे अभ्यासक व अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांना छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2025 चा जाहीर करण्यात आला आहे.
6 जून रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी wmbn फाउंडेशनच्या भारत क्रांती मिशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव 2025 चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा अत्यंत प्रतिष्ठा तत्येचा पुरस्कार असून, आज पर्यंतच्या नि स्वार्थ सामाजिक कार्याची दखल म्हणून,
प्रधान त्यांना करण्यात येणार आहे. राजेंद्र कोढरे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजात महत्वपूर्ण असे काम केले आहे. ज्यामुळे हजारो नवे लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्यामुळे त्यांची दूरदृष्टीचे आणि समर्पित कार्य या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.
हा गौरवशाली पुरस्कार येत्या 22 जून रोजी छत्रपती संभाजी नगर येथे एका विशेष समारंभात प्रदान करण्यात त्यांना येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, अखिल भारतीय मराठा महासंघ सासवड, जेजुरी, परिचेे, दिवे, गराडे, माळशिरस अशा विविध शाखेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष करून मराठा महासंघाचे पुरंदर तालुक्यातील मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.






