श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीपायी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
आषाढीपायी वारी पालखी सोहळ्यानिमित्त सासवड येथे पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक आषाढीपायी वारी पालखी सोहळा हा पुरंदर तालुक्यात रविवार दि. 22 ते गुरुवार दि. 26 असा चार दिवस पुरंदर तालुक्यात असणार आहे, या सोहळ्यानिमित्त नियोजन व सर्व समावेशक सुविधा साठी तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सासवड येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पुरंदर तालुक्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांची पूर्वतयारी आढावा बैठक घेतली,
या बैठकीत पालखी मार्ग, तळ विसावा आणि सुरक्षेच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात याव्या, असे सांगितले. तसेच आषाढी वारीसाठी ही पंढरपूरची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे, यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाल्यामुळे, सर्व वारकऱ्यांना एक प्रकारचे गत वैभव वाढत जाऊन, भरभराट त्यांच्या जीवनात होणार आहे.
सर्व मानाच्या पालख्यांना व वारकऱ्यांना पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालय व पोलीस बंदोबस्त चोख ठेवावा, अशा सूचना सुद्धा राजपूत यांनी केल्या.सर्व विभागांनी एकत्र येऊन, हा पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा असे सुद्धा सुचित केले. यासाठी सासवड शहरात विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी,
प्रत्येक पालखीला जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरुंद रस्त्यांची रुंदीकरण, वारकरी पालखीतळ सोबत साध्या कार्डियाकस ॲम्बुलन्स, दर्शन पास ची संख्या, वॉटरप्रूफ टेन्ट पाण्याचे टँकर मुबलक असा औषध साठा पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास फिरती शौचालय यासाठी, सूचना सुद्धा राजपूत यांनी केल्या आहेत. या बैठकीत निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील,
गट विकास अधिकारी प्रणोती श्री माळ, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता स्वाती दहिवाल, सासवड नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, महावितरण चे कार्यकारी अभियंता भालचंद्र गवई,
आरोग्य अधिकारी पुरंदर डॉ. विक्रम काळे, पाणीपुरवठा उप अभियंता सचिन घुबे, याबरोबर श्री संत सोपान काका महाराज देवस्थान व श्री संत चांगावटेशवर महाराज देवस्थानचे पदाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.






