ताज्या घडामोडीपुणे

सासवड येथे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधातील बाधित शेतकऱ्यांचा सासवडच्या आठवडे बाजारात चौका चौकात बॅनर घेऊन तीव्र विरोध


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::

सासवड येथे पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधातील बाधित शेतकऱ्यांचा विरोध सासवडच्या आठवडे बाजारात चौका चौकात शांततेच्या मार्गाने तीव्र विरोध बाधित साथ गावातील शेतकऱ्यांचा सहभाग

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प विरोधात पुन्हा एकदा सात गावातील शेतकऱ्यांनी सासवडच्या आठवडे बाजारात चौका चौकात शांततेच्या मार्गाने नागरिका समोर पोस्टर हातात घेऊन, उभे राहून विरोध केला. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून, शेतकऱ्यांचा आवाज प्रशासन दरबारी पोहोचवण्यासाठी ध्वनी प्रदूषण

कोणताही स्पीकर, ढोल घोषणाबाजी केली नाही. पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे नसून, किंवा त्यांचे विकासाचे नसून हे निव्वळ मोठमोठे उद्योगपतींच्या व्यवसायासाठी आहे. शासनाने जाहीर केलेल्या, पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प विरोधात पुन्हा एकदा सात गावातील शेतकरी एकत्र आले आहेत.

प्रकल्प झाल्यास आपल्याला बेघर आणि भूमिहीन व्हावे, लागणार आहे. तसेच शासनाची पुढील दिशा अद्याप निश्चित नाही, यामुळे सात गावातील शेतकरी शासनाच्या या निर्णयाला विरोध केला आहे. पोस्टर मजकुरासाठी सूचना 1) शेती वाचवा पुरंदर विमा तळ थांबवा. 2) शेतकऱ्यांची जमीन कोणाच्या बापाची नाही.

3) कोरड्या विकासाला हिरव्या जमिनीची किंमत समजवा. 4) आमचं भविष्य हवाई नाही, मातीवरच आहे. 5) गावाचं दैवत करा, माईच मंदिर विकासाच्या नावाखाली विसरू नका. 6) पिढ्यान पिढ्या जोपासलेली शेती आमचं घर, आमचं जग. 7) नातेसंबंध सगे सोयरे, देऊळ, वाडे हाच आमचा खरा ठेवा.

8) हे शेत नाही, आमचं जीवन आहे, कधीही न तोडावं असं नातं. 9) पुरंदर गड करा माई, आणि माती हेच आमचे तिन्ही आधार. 10) गाव गेला, दैवत गेलं, वारसा गेला असा कोणता विकास. 11) माती ही आमची माय आहे, ती विकायची
नाही, जपायची आहे.


Translate »
error: Content is protected !!