ताज्या घडामोडीपुणेराजकीय

पुरंदर – सरपंच आरक्षण सोडती नंतर इच्छुक लागले निवडणुकीच्या तयारीला


सह्याद्री माझा
सरपंच आरक्षण सोडतीनंतर इच्छुक लागले तयारीला.

जानेवारी २०२६ मध्ये पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रापंचायतीच्या निवडणुका.

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक —– मागील आठवड्यात झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर,तसेच ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे.गावागावांत नव्याने नेतृत्व उभे राहण्यासाठी इच्छुकांनी मैदानात उतरायची सुरुवात केली

आहे.काही गावात जुन्या नेतृत्वाला विरोध करत,नव्या चेहऱ्यांची नावे चर्चेत आहेत.परंतु सरपंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावा-गावांत हौसे,नौसे,गौसे,भावी सरपंच चांगलेच हवेत असल्याचे बघायला मिळत आहे.त्यामुळे मातब्बर पुढाऱ्यांची आतापासूनच डोकेदुखी वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून स्थानिक गाव पुढाऱ्यांचे सरपंच आरक्षण निवडीकडे लक्ष लागले होते.पुरंदर तालुक्यात ९३ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर झाले.पुढील वर्षी जानेवारी महिन्यांत मुदत संपणाऱ्या ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील.

या आरक्षणामुळे काही गावांमध्ये भावी सरपंच होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.आरक्षणाने आपल्याच गटाला संधी मिळाल्याचे लक्षात येताच काही गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.इच्छुक उमेदवारांनी गावातील जनसंपर्क वाढवण्यास,विकासाच्या मुद्द्यांवर भर देण्यास सुरुवात केली असून,काही ठिकाणी यासाठी बैठकाही घेण्यात येत आहेत.

पुढील आठ महिन्यांत ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील.यासाठी आताच तयारी सुरू झाली आहे.ग्रामपंचायत ही गावच्या विकासाची सर्वांत महत्त्वाची यंत्रणा असून,केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना थेट ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येतात.त्यामुळे सरपंच पदावर येणाऱ्या व्यक्तीला मोठे अधिकार प्राप्त होतात;हे लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते सरपंच पदासाठी प्रयत्नशील झाले आहेत.

आरक्षणा नुसार उमेदवारांची चाचपणी..

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांना अधिक महत्त्व दिले जाते.सध्या सर्व ग्रामपंचायतींची सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार असल्यामुळे त्या गावातील सरपंच आरक्षणानुसार उमेदवाराची चाचणी सुरू झाली आहे.सरपंचासाठी सक्षम उमेदवार निवडण्यासाठी गाव पुढारी कामाला लागले असून जनतेत चांगला जनसंपर्क असलेला उमेदवाराचा पॅनलप्रमुख शोध घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यात अनेक तरूण चेहऱ्यांना संधीची आशा लागली आहे.

चौकट- जनतेतून सरपंच नियुक्तीमुळे मोठी रस्सीखेच..

यावेळी,सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्यामुळे मोठी रस्सीखेच असणार आहे.आरक्षणानुसार त्या गावातील सर्वसमावेशक नेतृत्वाला संपूर्ण पाच वर्षांचा कालावधी मिळणार आहे.गावातील ग्रामपंचायत सदस्यांना एवढे महत्त्व राहणार नसल्यामुळे अनेक गावांतील ग्रामपंचायतीतील सदस्यांचा खर्च भावी सरपंचाना करावे लागणार,अशी शक्यता निर्माण झाली आहे.

चौकट १) पुरंदर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींची निवडणूक जानेवारी २०२६ मध्ये,म्हणजेच आठ महिने आधी सरपंच आरक्षण जाहीर झाल्याने इच्छूकांना मोठा कालावधी मिळाला आहे. याचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे.ज्या मोठ्या गावात एक भावकी किंवा एका आडनावाची लोकं जास्त तेथे एकत्रित येत ठरवून सरपंचपदाचा उमेदवाराची चाचपणी केली सुरू आहे.

चौकट ३) राज्यातील सत्तांतरानंतर राजकीय पक्षाच्या भुमिकेत मोठ्या प्रमाणावर बदल घडले.पुर्वी असलेले राष्ट्रिय पक्षांचे कार्यकर्ते आता वेगळ्याच पक्षाच्या विचारधारेकडे आहेत.राष्ट्रीय पक्षांचे पदाधाकारी आता फक्त आपल्या पक्षाचा सरपंच कसा होईल याकडे लक्ष ठेऊन आहेत.त्यामुळे सरपंचपदाचा उमेदवार हा उच्च शिक्षित,आर्थिक सक्षम,सामाजिक दायित्व असलेला व लोकाभिमुख असल्यास पक्ष त्यांना ताकद देईल अशा चर्चा रंगत आहेत.


Translate »
error: Content is protected !!