पुणेशैक्षणिक

श्री रमेश बोरावके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

श्री रमेश बोरावके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक
श्री शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद मधील विद्यार्थी प्रिय, शिस्तप्रिय, संवेदनशील, हसमुख विज्ञाननिष्ठा, साहित्य संस्कृती जोपासणारे ,अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे उपक्रमशील शिक्षक रमेश बोरावके सर यांना स्वर्गीय मा. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ,

पुणे जिल्हा शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी, महिला शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने मंचर येथील महात्मा गांधी सभागृह आंबेगाव येथे आज मा.शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते ,महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी के थोरात,

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष के एस डोमसे, आंबेगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी जीवन कोकणे साहेब , यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी उदय शिवाजीराव पाटील, राजाराम बाणखेले , पुणे जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष पंकज घोलप, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारी सचिव तानाजी झेंडे, जिल्हा प्रतिनिधी संजय भिंताडे पुणे जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल चे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, हवेली तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप थोपटे.

या मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघाच्या अध्यक्ष स्नेहल बाळसराफ, गुणवंत शिक्षिका स्नेहलता बोरावके, ज्योती दहिदुले आदी मान्यवर उपस्थित होते.

रमेश बोरावके हे खळद विद्यालयात गेली अनेक वर्षापासून हिंदी विषयाचे ज्येष्ठ व तज्ञ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यकाळात दहावीचा निकाल सतत 100% लागत आहे. तसेच त्यांनी क्रीडा शिक्षक, स्काऊट मास्टर, जिल्हा प्रशिक्षक, नाट्यदिग्दर्शन, चित्रकला ग्रेड परीक्षा मार्गदर्शक,

म्हणून ही त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे, मी सावित्री बाई फुले बोलतेय व मी महात्मा ज्योतिबा फुले बोलतोय या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन केले त्यांनी विद्यालयाच्या मुली कबड्डी स्पर्धेत जिल्हा स्तरावपर्यंत नेण्यात मोलाचे योगदान दिले आहे.तसेच विविध तालुका स्तरीय शिबिरांचे यशस्वीपणे आयोजन ही केले आहे विद्यालयाच्या गुणात्मक, संख्यात्मक, शाळा डिजिटल करण्यामध्ये, वृक्षारोपण व शालेय विविध उपक्रम वाढीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे.

त्याचबरोबर त्यांनी महात्मा फुले यांच्या मूळ गावात सहकार क्षेत्रात तसेच राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत ग्रामपंचायत खानवडीचे सरपंच पद सुद्धा भूषविले आहे. आज जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आनंदीकाकी जगताप, मा.आमदार संजयजी जगताप साहेब, मार्गदर्शक राजेंद्र बापू जगताप,

संस्थापक सचिव, प्राध्यापक डॉक्टर. सी .ए. एम .एस जाधव साहेब,सहसचिव दत्तात्रेय गवळी साहेब, सरपंच संदीप यादव,स्थानिक सल्लागार रामदास भाऊ कामथे संचालक बाळासाहेब रासकर, बाळासाहेब कामथे हरिभाऊ फुले पाटील, सरव्यवस्थापक रवींद्र जगताप, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ टापरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी पालक यांनी अभिनंदन केले .


Translate »
error: Content is protected !!