मराठी भाषा गौरव दिन वीर बाजी पासलकर विद्यालय सासवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न :
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
मराठी भाषा गौरव दिन वीर बाजी पासलकर विद्यालय, सासवड येथे संपन्न :
प्रतिनिधी( सासवड ) : महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखा व सासवड नगरपालिका शिक्षण मंडळ संचलित वीर बाजी पासलकर विद्यालय शाळा क्रमांक एक येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यवरांचे शाळेच्या वतीने श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त महान साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेला पडलेले स्वप्न होते.
करेल जो मनोरंजन मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे. या उक्तीनुसार कविवर्य अनिल कदम यांनी मुलांना मनोरंजन पर गोष्टी सांगून स्वलिखित ‘समेवर येताना ‘ या काव्यसंग्रहातील कविता गेय गाऊन दाखविल्या व पुस्तक शाळेला भेट दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक केशव काकडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळीक, कार्याध्यक्ष सतीश पाटील, प्रमुख पाहुणे केशव काकडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कोडीतकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुकाराम मुळीक यांनी मराठी भाषेला जागतिक अभिजात भाषेचा दर्जा मिळलेला असताना मराठी भाषेचे महत्व कशा प्रकारे वृद्धिंगत होईल या विषयाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.याबरोबरच मराठी साहित्य परिषद सासवड शाखेचे कार्याध्यक्ष सतीश पाटील यांनी कुसुमाग्रजांची नावाजलेले नटसम्राट विशाखा हे पुस्तक मुख्याध्यापिका माधुरी मुळीक यांना शाळेसाठी भेट दिले .
विशेष म्हणजे या विद्यालयात बरेचसे विद्यार्थी द्विभाषिक असून सुद्धा त्यांनी मराठीत सुंदर पद्धतीने भाषण केले हे वैशिष्ट्य ठरले. यावेळी मुलांची प्रभात फेरी, ग्रंथदिंडी काढून मराठी भाषेचा जागर करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे, कवितांचे प्रदर्शन भरवि ण्यात आले होते हे प्रशंसनीय होते.
यावेळी वर्षा खळदकर, वासंती बडदे, मीना कांबळे, संगीता हराळे, विजयश्री घोगरे पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका माधुरी मुळीक व सूत्रसंचालन संजीव कांबळे यांनी केले.






