ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

वाघीरे महाविद्यालयातील सासवड येथील एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांची सैन्य व राज्य पोलीस सेवांमध्ये निवड


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे –
वाघीरे महाविद्यालय, सासवड विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य व राज्य पोलीस सेवांमध्ये निवड*

वाघीरे महाविद्यालय, सासवड येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभाग हे केवळ शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीचे प्रशिक्षण देणारे केंद्र नसून, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे एक प्रेरणादायी मंच ठरले

आहे. यंदा या विभागातील कॅडेट्सनी भारतीय सैन्य, नौदल, केंद्रीय व राज्य पोलीस सेवांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.काही करुन सैन्यात भरती व्हायचं होतं, त्याचं सैन्य भरतीचं स्वप्न उराशी

बाळगलं होतं, त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरु होते. आजअखेर त्यांचं सैन्य भरतीचं स्वप्न पूर्णात्वाला आलं आहे. त्याची जिद्द, मेहनत फळाला आली आहे. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे, कुटुंबाचे आणि परिसराचेही नाव उज्ज्वल केले आहे.

“शिस्त, संघर्ष आणि समर्पणाच्या बळावर कोणतीही स्वप्ने अपूर्ण राहत नाहीत!”

यशस्वी कॅडेट्सची यादी पुढीलप्रमाणे – 36 MAH BN NCC (Army Senior Division) मधून भारतीय सैन्य दलात SGT प्रतिक खैरे, SUO प्रथम इंदळकर, CDT सुरज ठोंबरे, CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) मध्ये JUO तेजस कुंभारकर,

SRPF (राज्य राखीव पोलीस बल) मध्ये CDT रोहित चव्हाण, पुणे ग्रामीण पोलीस मध्ये CDT गणेश हगवणे, 3 MAH NAVAL UNIT (Navy Senior Division) मधून भारतीय सैन्य दलात Ldg CDT प्रतीक भांडाळकर,

मुंबई पोलीस दलात CDT प्रविण टकले, CDT तेजस भींताडे व 2 MAH GIRLS BN मधून भारतीय नौदलात SUO सोनिया शिंदे तसेच श्री. ऋषिकेश कामथे, श्री. संदेश भगत असे एकूण १२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

सैन्य दलातील निवडीने आम्ही खूप आनंदी झालो आहोत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या सर्वांचं यश सहजासहजी मिळालेलं नाही, त्यानं यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत.

आज आमच्या या विद्यार्थ्यांच्या निवडीनं महाविद्यालयाचा अभिमान सर्वदूर पोहचला आहे. त्याचा हा यशाचा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

या सर्व कॅडेट्सना त्यांच्या NCC प्रशिक्षणादरम्यान प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट गजेंद्र मनोहर अहिवळे, सब लेफ्टनंट सुनील शिंदे आणि डॉ. शीतल कल्हापुरे यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार,

उपाध्यक्ष श्री. राजेंद्र घाडगे, सचिव मा. ॲड. श्री. संदीप कदम, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, वाघीरे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि संपूर्ण PDEA परिवारातर्फे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.


Translate »
error: Content is protected !!