ताज्या घडामोडीपुणे

श्री संत सोपान काका पालखी सोहळ्यात बँक ऑफ इंडिया जपली अविरत वारी सेवा


संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी – बापू मुळीक::

सोपानकाका पालखी सोहळ्यात बँक ऑफ इंडियाने जपली अविरत वारी सेवा….

सासवड प्रतिनिधी :                                        दरवर्षी श्री संत सोपानदेव महाराज यांच्या आषाढवारीच्या पालखी सोहळ्यात सासवड येथील
बँक ऑफ इंडियाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाणी तसेच फराळ वाटपाची परंपरा सलग ४० व्या वर्षीही अखंडित सुरू आहे.

सोमवारी  सोपानदेव पालखी सोहळ्याचे प्रस्थान प्रसंगी बँकेने तीनशे किलो गुडदाणी पॅकेट तसेच शंभर किलोहून अधिक बुंदी लाडू व सुमारे दोन हजार पिण्याच्या पाण्याचा बाटल्यांचे वितरण करुन एक सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे. बँकेचे पुणे विभागाचे
व्यवस्थापक (झोनल मॅनेजर) संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमास अधिकारी व कर्मचारी
संघटनेचे प्रमोद शिंदे,

सासवड शाखाधिकारी सचिन डोलताडे यांसह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप व पालखी सोहळा प्रमुख ॲड त्रिगुण गोसावी , श्रीकांत गोसावी, मुक्ताई देवस्थानचे संदीप पाटील यांनी या उपक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यांचा सन्मान कदम साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

    झोनल मॅनेजर संजय कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक करत एका अत्यंत सुंदर,अध्यात्मिक कार्यक्रमास उपस्थित राहता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय शेटे यांनी प्रास्ताविक केले तर गिरीराज गडदरे यांनी आभार मानले. हेमंत ताकवले यांनी सर्वांचे स्वागत केले. दिपक पाटील, दिलीप ठोंबरे, रंगनाथ संगम 
उल्हास आढाव, रमेश कानडे, विलास मोकाशी, काळुराम घारे यांसह अनेक आजी माजी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नीता पाटील, रश्मी बंडे, सौरभ कुमार, गुरुप्रसाद सुतार, विकास जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले


Translate »
error: Content is protected !!